याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 16:31 IST2025-12-19T16:15:37+5:302025-12-19T16:31:46+5:30

या शेअरने केवळ पाच वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे...

भारतीय शेअर बाजारात गेल्या काही वर्षांत अनेक 'मल्टीबॅगर' शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यांत एक स्टॉक म्हणजे, 'इंडो थाई सिक्युरिटीज'चा (Indo Thai Securities). हा शेअर सध्या सर्वात मोठा वेल्थ क्रिएटर म्हणून समोर आला आहे. या शेअरने केवळ पाच वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

हा सेअर पाच वर्षांपूर्वी केवळ २ रुपयांवर होता. तो आता ३६० रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीने तब्बल १९,०००% एवढा तगडा परतावा दिला आहे.

या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना थक्क करणारा परतावा दिला आहे. २०२४ वर्षात या शेअरने ४५५% परतावा दिला होता. तसेच या वर्षात या शेअरने आतापर्यंत १८६% चा परतावा दिला आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज तिचे मूल्य सुमारे १.९५ कोटी रुपये झाले असते. महत्वाचे म्हणजे, जुलै २०२५ मध्ये कंपनीने १:१० प्रमाणात 'स्टॉक स्प्लिट' केला आहे, यामुळे गुंतवणूकदारांना अधिक लाभ मिळाला आहे.

जुलै २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान या शेअरमध्ये एकतर्फी तेजी दिसून आली होती. मात्र त्यानंतर, बाजारातील दबावामुळे सहा महिन्यांत हा शेअर २१% घसरला होता. मात्र, सप्टेंबरमध्ये या शेअरने जोरदार मसुंडी मारत केवळ एका महिन्यातच ७८% ची उसळी घेतली आणि त्यानंतरच्या महिन्यात ४३% ची वाढ नोंदवली.

१९९५ मध्ये स्थापन झालेली इंडो थाई सिक्युरिटीज ही भारतातील एक प्रमुख फुल-सर्विस ब्रोकिंग हाऊस आहे. १६ कंपन्यांचा समावेश असलेला हा एक समूह आहे. जो केवळ शेअर बाजारातच सक्रीय नाही.

इंडो थाई सिक्युरिटीज ही रिअल इस्टेट, ग्रीन टेक्नॉलॉजी (फेम्टो) आणि 'आयएफएससी' (IFSC) सारख्या क्षेत्रांतही कार्यरत आहे. ही कंपनी कॉर्पोरेट्स आणि मोठ्या ट्रेडर्सना वैयक्तिक वित्तीय सेवाही पुरवते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)