शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 15:23 IST

1 / 9
शेअर बाजारातील मल्टीबॅगर कंपनी ऑटोराइडर्स इंटरनॅशनलने (Autoriders International) आपल्या गुंतवणूकदारांना मोठे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. लॉजिस्टिक्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीने ५:१ या रेशोमध्ये बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे.
2 / 9
अर्थात, शेअरधारकांना त्यांच्याकडील १ शेअरवर ५ अतिरिक्त मोफत शेअर्स मिळणार आहेत. या बोनस शेअर्ससाठी १८ नोव्हेंबर (मंगळवार) ही 'रेकॉर्ड डेट' निश्चित करण्यात आली आहे. या शेअरने गेल्या दोन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जाम खूश केले आहे.
3 / 9
केवळ दोन वर्षांत १६०००% एवढा बंपर परतावा - ऑटोराइडर्स इंटरनॅशनलच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या दोन वर्षांत आश्चर्यचकित करणारा परतावा दिला आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच ७ डिसेंबर २०२३ रोजी या शेअरची किंमत ३०.०७ रुपये एवढी होती. ती १४ नोव्हेंबर २०२५ रोजी BSE वर ५०८७.६० रुपयांवर पोहोचली. अर्थात, या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल १६८१९ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
4 / 9
गेल्या एका वर्षाचा विचार करता, गेल्या वर्षभरात हा शेअर १४९.९० रुपयांवरून ५००० रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत या शेअरने तब्बल ३२९४ टक्क्यांचा परतावा दिला आहे.
5 / 9
या वर्षाचा विचार करता या शेअरमध्ये आतापर्यंत (YTD) १६१७ टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. तर गेल्या सहा महिन्यांत हा शेअर १०४० टक्क्यांनी वधारला आहे.
6 / 9
ऑटोरायडर्स इंटरनॅशनल शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५०८७.६० रुपये एवढा असून, नीचांक १४९.९० रुपये एवढा आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१७ मध्येही कंपनीने १:१ या रेशोमध्ये बोनस शेअर्स दिले होते.
7 / 9
सध्या कंपनीचे बाजार भांडवल (Market Cap) २९५ कोटी रुपयांहून अधिक आहे. कंपनीमध्ये प्रमोटर्सचा वाटा ६२.४३ टक्के एवढा आहे. तर सार्वजनिक (Public) हिस्सा ३७.५७ टक्के एवढा आहे.
8 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकStock Marketस्टॉक मार्केटMONEYपैसा