तीव्र घसरणीतही 'या' म्युच्युअल फंडांचा २४ टक्केपर्यंत परतावा; १ वर्षात १ लाख रुपयांचे किती झाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 11:33 IST2025-04-01T11:30:30+5:302025-04-01T11:33:17+5:30
Mutual Funds : आजपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आहे. अनेकजण या दिवसापासून नव्याने गुंतवणुकीची सुरुवात करतात. शेअर बाजारात गेल्या आर्थिक वर्षात मोठे चढउतार पाहायला मिळाले. बाजाराला अनेक महिने सतत घसरणीचा सामना करावा लागला.

या घसरणीत बहुतेक गुंतवणूकदारांचे स्टॉक पोर्टफोलिओ रसातळाला गेले. बाजारातील मोठ्या घसरणीमुळे म्युच्युअल फंडांवरही वाईट परिणाम झाला. या काळातही असे अनेक म्युच्युअल फंड होते, ज्यांनी केवळ गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ व्यवस्थापित केले नाही तर चांगला परतावा देखील दिला.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही इक्विटी म्युच्युअल फंडांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात त्यांच्या गुंतवणूकदारांना एकरकमी गुंतवणुकीवर २४ टक्क्यांपर्यंत बंपर परतावा दिला.
Motilal Oswal Large Cap Fund : आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सर्वाधिक नफा कमावणाऱ्या इक्विटी म्युच्युअल फंडांच्या यादीत मोतीलाल ओसवाल लार्ज कॅप फंड अव्वल आहे. या म्युच्युअल फंड योजनेमुळे गुंतवणूकदारांची १ लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक २४.०३ टक्के सीएजीआरने १.२४ लाख रुपये झाली आहे.
Motilal Oswal Flexi Cap Fund : मोतीलाल ओसवाल फ्लेक्सी कॅप फंड या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, या म्युच्युअल फंडाने १६.९१ टक्के CAGR सह गुंतवणूकदारांची १ लाख रुपये एकरकमी १.१६ लाख रुपये केली आहे.
Invesco India Midcap Fund : सर्वाधिक नफा कमावणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या यादीत इन्व्हेस्को इंडिया मिड कॅप फंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात, या म्युच्युअल फंडाने १६.९० टक्के CAGR सह गुंतवणूकदारांच्या १ लाख रुपयांचे १.१६ लाख रुपये करुन दिले.
Motilal Oswal Small Cap Fund : मोतीलाल ओसवाल स्मॉल कॅप फंड २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सर्वाधिक फायदेशीर इक्विटी म्युच्युअल फंडांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. या म्युच्युअल फंड योजनेने गुंतवणूकदारांची १ लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक १६.६८ टक्के CAGR वर १.१६ लाख रुपयांमध्ये बदलली आहे.
Edelweiss Mid Cap Fund : एडलवाईस मिड कॅप फंड सर्वाधिक परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. या फंडाने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १६.०३ टक्के CAGR वर गुंतवणूकदारांची १ लाख रुपयांची गुंतवणूक १.१६ लाख रुपयांमध्ये बदलली आहे.