शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतीयांचा डंका ! दिग्गज कंपन्यांच्या प्रमुख पदावर 'इंडियन'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 1:51 PM

1 / 8
यू-ट्यूब या गुगलच्या व्हिडीओ प्लॅटफॉर्मच्या सीईओपदावर भारतीय वंशाचे नील मोहन यांची नियुक्ती झाली. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट या कंपनीचेही सीईओ सुंदर पिचाई हेदेखील भारतीय वंशाचे आहेत.
2 / 8
केवळ याच नव्हे तर अनेक कंपन्यांच्या सीईओपदावर भारतीयांची वर्णी लागली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.
3 / 8
सुंदर पिचाई सुंदर पिचाई हे २००४ मध्ये गुगलमध्ये प्रवेश केला. २०१५ मध्ये गुगल हा अल्फाबेट कंपनीचा भाग झाला आणि पिचाई हे अल्फाबेटचे सीईओ झाले.
4 / 8
सत्या नाडेला जगातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी मायक्राेसाॅफ्टच्या सीईओपदावर सत्या नाडेला हे विराजमान आहेत. २०१४ पासून ते या पदावर कार्यरत आहेत.
5 / 8
लक्ष्मण नरसिंहन कॉफी चेन कंपनी स्टारबक्सच्या सीईओपदावर लक्ष्मण नरसिंहन यांची नियुक्ती घोषणा करण्यात आली आहे. त्यांना तात्पुरती जबाबदारी दिली आहे.
6 / 8
अरविंद कृष्णा अरविंद कृष्णा हे आयटी कंपनी आयबीएमचे सीईओ आहेत. २०२० पासून ते या पदावर आहेत. २०२१ मध्ये ते कंपनीचे अध्यक्ष झाले.
7 / 8
शंतनू नारायण सॉफ्टवेअर कंपनी ॲडोबचे अध्यक्ष आणि सीईओ शंतनू नारायण हे आहेत. ते २००७ पासून यापदासह कंपनीचे अध्यक्षदेखील आहेत.
8 / 8
अजयपाल बंगा अजय बंगा हे जनरल अटलांटिकचे उपाध्यक्ष आहेत. यापूर्वी ते २०१० ते २०२० या कालावधीत मास्टरकार्डचे सीईओ होते.
टॅग्स :googleगुगलYouTubeयु ट्यूबSundar Pichaiसुंदर पिचई