20 कोटींच्या गाड्या अन् 60 कोटींचा बंगला; YouTube मधून टेक्निकल गुरुजीची बक्कळ कमाई...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 05:28 PM2023-06-12T17:28:42+5:302023-06-12T19:01:27+5:30

Technical Guruji Gaurav Chaudhary: गौरव चौधरी उर्फ टेक्निकल गुरुजीने 2015 मध्ये YouTube चॅनल सुरु केले. आज त्याचे 2.29 कोटी फॉलोअर्स आहेत.

Technical Guruji Gaurav Chaudhary: आजकाल बहुतेक लोकांकडे स्मार्टफोन आहे आणि प्रत्येकजण YouTube चा वापर करतो. युट्यूब वापरणारा क्वचितच कुणी असेल, ज्याला टेक्निकल गुरुजीबद्दल माहिती नाही. तुम्हालाही टेक्निकल गुरुजी माहीत नसेल तर आम्ही सांगतो की, गौरव चौधरी हा युट्यूबवर टेक्निकल गुरुजींच्या नावाने आपले टेक चॅनल चालवतो.

त्याचे चॅनल जगातील सर्वाधिक पाहिले जाणारे टेक चॅनल आहे. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याने एवढी कमाई केली आहे की, आज त्याच्याकडे सुमारे 20 कोटींच्या आलिशान गाड्या आणि दुबईमध्ये 60 कोटींचा बंगला आहे. गौरव त्याच्या युट्यूब चॅनल टेक्निकल गुरुजीवर तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टी सांगतो. त्याची सांगण्याची पद्धत अतिशय हटके आहे, त्यामुळे आज टेक्निकल गुरुजीच्या चॅनलचे यूट्यूबवर सुमारे 2.29 कोटी फॉलोअर्स आहेत.

गौरव चौधरी हा मूळचा राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचा जन्म 1991 साली झाला. त्याचे शालेय शिक्षण अजमेरमधूनच झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर गौरवने BITS पिलानीच्या दुबई कॅम्पसमधून मायक्रोइलेक्ट्रॉनिकचे शिक्षण घेतले. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर गौरवने त्याचे यूट्यूब चॅनल उघडले आणि लोकांना तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टींची माहिती देण्यास सुरुवात केली. आता गौरव फक्त यूट्यूब चॅनलच चालवत नाही तर दुबईमध्ये त्याचा व्यवसायही करतो.

गौरव दुबई पोलिसांना सुरक्षेशी संबंधित गॅजेट्स पुरवतो. याशिवाय तो इतर अनेक संस्थांना सुरक्षा गॅजेट्सही पुरवतो. गौरव सध्या दुबई पोलिसांसाठी सिक्‍योरिटी सिस्‍टम इंजीनियर म्हणून काम करतो. गौरवच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यावर त्याच्या यूट्यूब चॅनल आणि त्याच्या व्यवसायाद्वारे सुमारे 369 कोटी रुपयांची संपत्ती कमावली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौरवच्या कुटुंबीयांची इच्छा होती की त्याने किराणा मालाचा कौटुंबिक व्यवसाय हाती घ्यावा, परंतु त्याने 2015 मध्ये त्याचे यूट्यूब चॅनल उघडून वेगळा मार्ग स्वीकारला. गौरवच्या या निर्णयाचा परिणाम म्हणजे आज दुबईमध्ये त्याच्याकडे 11 आलिशान गाड्यांचा ताफा आहे. याशिवाय दुबईमध्ये त्याचा स्वतःचा 60 कोटींचा बंगलादेखील आहे.

आज गौरव चौधरीकडे रोल्स रॉयस घोस्ट - 8 कोटी, मॅकलरेन जीटी - 4.75 कोटी, रेंज रोव्हर वोग - 2.10 कोटी, पोर्श पानामेरा GTS - 1.90 कोटी, पोर्श पानामेरा - 1.89 कोटी, मर्सिडीज बेंझ जी-क्लास - 1.72 कोटी, मर्सिडीज बेंझ 500ML - 81.70 लाख, ऑडी A6 - 68 लाख, महिंद्रा थार - 15.54 लाख किमतीच्या गाड्या आहेत.