₹375 चा शेअर आपटून ₹14 वर आला; आता 3 महिन्यांत दिला 108% परतावा; खरेदीसाठी लोकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 06:55 PM2023-06-28T18:55:07+5:302023-06-28T19:04:29+5:30

या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना एका महिन्या 50 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे.

रिन्यूएबल एनर्जी सोल्यूशन्स प्रोव्हायडर कंपनी सुझलॉन एनर्जीचा शेअर सातत्याने वधारताना दिसत आहे. कंपनीला मिळत असलेल्या ऑर्डर्स आणि बॅलेन्स शीट मजबूत असल्याने या शेअरच्या किंमतीत वाढ होत आहे.

आज बुधवारी सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये जवळपास 6 टक्क्यांनी वाढ झाली असून कंपनीचा शेअर 14.80 रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या 13 जून 2023 रोजी या शेअरची किंमत 15.76 रुपये होती. हा शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक आहे. तर, 28 जुलै 2022 रोजी या शेअरची किंमत 5.43 रुपये होती. हा शेअरचा 52 आठवड्यांतील निचांक आहे. या शेअरचा ऑल टाईम हाय रेट ₹375 एवढा आहे.

बीएसईचा विचार करता या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना एका महिन्या 50 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. याचबरोबर तीन महिन्यांत 108 टक्क्यांचा, तर एका वर्षाच्या कालावधीत 127 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

गेल्या एका वर्षाच्या काळात सुझलॉन एनर्जीच्या शेअरची किंमत वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. यात मजबूत आर्थिक कामगिरीसोबतच अनेक पवन ऊर्जा प्रकल्पांच्या यशस्वी अधिग्रहणाचाही समावेश आहे.

ट्रेंडलाइनच्या आंकडेवारीनुसार, किरकोळ गुंतवणूकदारांनी Q4FY23 मध्ये आपला वाटा 0.30% वाढविला आहे. यामुळे त्यांचा एकून वाटा 72.3% झाला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)