शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Success Story: कॉल सेंटरमध्ये नोकरी करता-करता सुचली कल्पना; आज उभारली कोट्यवधींची कंपनी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 3:08 PM

1 / 8
Success Story: शेअर मार्केटशी (Share Market) संबंधित लोकांना 'निखिल कामत'(Nikhil Kamath) आणि 'झिरोदा' (Zerodha), ही दोन्ही नावे माहीत आहेत. सध्या निखिल कामत यांची गणना अशा मोजक्या लोकांमध्ये केली जाते, ज्यांनी अपार कष्टाच्या जोरावर मोठे यश मिळवले आहे. निखिल कामत यांची कंपनी 'झिरोधा' सध्याच्या काळात सर्वात वेगाने वाढणारी स्टॉक ब्रोकिंग कंपनी आहे. निखिल कामतचा जीवनप्रवास साधारण नोकरीपासून कोट्यधीश होण्यापर्यंतचा आहे.
2 / 8
झिरोदाचे सह-संस्थापक निखिल कामत यांनी ह्युमन्स ऑफ बॉम्बेला (Humans of Bombay) नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपली कहाणी सांगितली आहे. निखिलने सांगितले की, त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी काम करायला सुरुवात केले होते. त्यांना पहिली नोकरी एका कॉल सेंटरमध्ये मिळाली, तिथे त्यांचा पगार फक्त 8000 रुपये होता.
3 / 8
आज त्यांची संपत्ती कोटींच्या घरात आहे. कामत यांचा शेअर बाजारातील प्रवास एका छोट्याशा ट्रेडिंगपासून सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी शेअर बाजाराला गांभीर्याने घेतले नाही, मात्र वर्षभरातच त्यांना बाजारातील मूल्य कळले आणि त्यांनी गांभीर्याने व्यवहार सुरू केला. याचा परिणाम म्हणून आज त्यांचे नाव अब्जाधीशांच्या यादीत गणले जाते.
4 / 8
मुलाखतीत कामत सांगतात की, एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना बचतीमधील काही पैसे मॅनेज करण्यास सांगितले. या पैशातून कामत बाजारात उतरले. कामत सांगतात की, त्यांचे वडील त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचे. हळुहळू निखिलने मार्केटवर पकड मिळवायला सुरुवात केली.
5 / 8
काही काळानंतर निखिलने त्यांच्या मॅनेजरलाही शेअर बाजारात पैसे गुंतवण्यास राजी केले. याचा फायदा मॅनेजरला झाल्यावर त्याने निखिलला मॅनेज करण्यासाठी इतर लोकांकडून पैसे घेऊन दिले. कामत सांगतात की, एका क्षणी अशी परिस्थिती निर्माण झाली की, त्यांनी नोकरीला जाणे बंद केले.
6 / 8
मॅनेजरला फायदा झाला तेव्हा त्याने इतर लोकांना सांगितले. यानंतर अनेकांनी पैसे मॅनेज करायला दिले, यामुळे इतर काही काम करण्यास वेळ मिळत नव्हता. यानंतर हळुहळून निखिल यांनी त्यांचा भाऊ नितीन कामत यांच्यासोबत कामत असोसिएट्स सुरू केले. यानंतर 2010 मध्ये 'झिरोदा'ची सुरुवात झाली.
7 / 8
आतापर्यंतच्या प्रवासाबाबत कामत सांगतात की, त्यांनी संघर्षातून काही गोष्टी शिकल्या आहेत. ते म्हणतात, शाळा सोडल्यापासून कॉल सेंटरमध्ये काम करण्यापर्यंतच्या माझ्या प्रवासात आणि झिरोधा आणि ट्रू बीकन सुरू करण्यापर्यंतच्या माझ्या प्रवासात मला असे आढळले आहे की माझ्यासाठी दोन किंवा तीन गोष्टी काम करत आल्या आहेत.
8 / 8
आज मी कदाचित अब्जाधीश झालो असेल, पण त्यानंतरही काहीही बदलले नाही. आजही मी दिवसातील 85 टक्के वेळ काम करतो. आताही अनेकदा भीती वाटते की, आयुष्यात काही गोष्टी चुकल्या तर पुढे काय होईल..? निखिल काम यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणार आहे. कष्टाच्या जोरावर एका कॉल सेंटरमध्ये काम करणारा व्यक्ती आज अब्जाधीश होऊ शकला आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक