जोरदार परतावा! 'या' सरकारी योजनेत ८,३३३ रुपये गुंतवा; ६८.७२ लाख रुपये मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:14 PM2023-09-26T12:14:45+5:302023-09-26T12:54:50+5:30

आपण बचतीसाठी अनेक पर्याय शोधत असतो, सरकारनेही बचतीसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.

बचत ही सर्वात महत्वाची असते. आपण पैशांची बचत करण्यासाठी अनेक ठिकाणी गुंतवणूक करत असतो, कधी परतावा मिळतो पण कधी हवा तसा मिळत नाही, सरकारनेही गुंतवणुकीच्या अनेक योजना तयार केल्या आहेत.

चांगली गुंतवणूक तुम्हाला कमी वेळेत उत्तम परतावा देऊ शकते. जर तुम्ही दीर्घ काळासाठी गुंतवणूक केली तर तुम्ही त्यावर मोठी रक्कम मिळवू शकता.

सरकारच्याही अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगली रक्कम गोळा करू शकता. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) असे या योजनेचे नाव आहे.

या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला सध्या ७.१ टक्के व्याज मिळत आहे. हा व्याजदर १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. इतकेच नाही तर या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला अनेक फायदेही मिळतात.

तुम्ही पीपीएफमध्ये केलेली गुंतवणूक १५ वर्षांत पूर्ण होते. मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही तो आणखी पाच वर्षांसाठी वाढवू शकता.

तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात किमान ५०० रुपये गुंतवू शकता. या योजनेत तुम्ही कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

तुम्हाला या योजनेत ८,३३३ रुपये गुंतवून ६८.७२ लाख रुपये गोळा करायचे असल्यास. यासाठी तुम्हाला दरमहा ८,३३३ रुपये वाचवावे लागतील आणि या योजनेत दरवर्षी १ लाख रुपये गुंतवावे लागतील.

तुम्हाला २५ वर्षांसाठी दरवर्षी १ लाख रुपयांची ही गुंतवणूक करावी लागेल. २५ वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला एकूण ६८.७२ लाख रुपये मिळतील.

या पैशातून तुम्ही तुमच्या भविष्याशी संबंधित सर्व महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करू शकता. पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्हाला आयकर कलम 80सी अंतर्गत कर डिडक्शनचा लाभ देखील मिळतो.