₹750 वरून आपटून ₹1 वर आला हा शेअर, गुंतवणूकदार झाले कंगाल, ₹1 लाखाचे झाले ₹208!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 16:58 IST2025-04-13T16:43:41+5:302025-04-13T16:58:22+5:30
कंपनीचा शेअर्स पाच दिवसांत २% तर एका महिन्यात ५% ने वधारला आहे...

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेडचा (आरकॉम) शेअर गेल्या शुक्रवारी ४% हून अधिकची उसळी घेऊन १.५६ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता. यापूर्वी हा शेअर सातत्याने घसरत होते.
या वर्षात आतापर्यंत हा शेअर १८% आणि गेल्या सहा महिन्यांत ३७% घसरला आहे. कंपनीचा शेअर्स पाच दिवसांत २% तर एका महिन्यात ५% ने वधारला आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या शेअर्सचा प्रवास अस्थिर राहिला आहे. २००७-०८ मध्ये कधी हा ७५० रुपयांच्याही वरच्या पातळीवर व्यवहार करत होता. मात्र आता तो पेनी स्टॉकच्या पातळीवर आला आहे.
आकडेवारीनुसार, कंपनीच्या शेअरची किंमत ९९.७२ टक्क्यांनी घसरली आहे. या काळात गुंतवणूकदारांची १ लाख रुपयांची गुंतवणूक २०८ रुपयांवर आली आहे.
कंपनी संकटात - रिलायन्स कम्युनिकेशन्सचे नियंत्रण अनिल अंबानी यांच्याकडे आहे. अनिल अंबानी 2008 मध्ये 42 बिलियन डॉलर एवढ्या संपत्तीसह जगातील 6व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. कधीकाळी त्यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी होती. मात्र, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने सुरू केलेल्या प्राइस वॉरमुळे अनिल अंबानींची कंपनी आर्थिक संकटात गेली.
२००२ मध्ये धीरूभाईंच्या निधनानंतर, अनिल आणि त्यांचे मोठे भाऊ मुकेश यांनी संयुक्तपणे रिलायन्स कंपन्यांचे नेतृत्व केले. तथापि, नियंत्रणावरून होणाऱ्या मतभेदांमुळे २००५ मध्ये दोघांमध्ये फूट पडली.
मुकेश यांनी तेल आणि पेट्रोकेमिकल्स व्यवसायांची जबाबदारी घेतली, तर अनिल यांनी त्याच वर्षी दूरसंचार, वीज निर्मिती आणि वित्तीय सेवा यासारख्या नवीन क्षेत्रांचे नियंत्रण मिळवले. वेगवेगळ्या क्षेत्रात विविधता आणण्याच्या प्रयत्नांत त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
२०१९ मध्ये, रिलायन्स कम्युनिकेशन्स एरिक्सन एबीच्या भारतीय युनिटला ५५० कोटी रुपये देऊ शकली नव्हती. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना (अनिल अंबानी) तुरुंगवासाची शक्यताही वर्तवली होती.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
तेव्हा न्यायालयाने त्यांना निधी उभारण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती. तेव्हा त्यांचे भाऊ मुकेश अंबानी यांनी शेवटच्या क्षणी आवश्यक आर्थिक मदत करण्यासाठी हस्तक्षेप केला होता. अनिल यांच्या मनोरंजन आणि संरक्षण उत्पादनातील गुंतवणुकीलाही अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे त्यांच्या कंपन्या कर्जात बुडाल्या.