मुकेश अंबानी यांच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढवलं, ₹१७ च्या विक्रमी नीचांकावर आला भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 20:43 IST2025-02-11T20:39:46+5:302025-02-11T20:43:19+5:30

शेअर बाजारात आज मंगळवारी मोठी घसरण दिसून आली. बीएसई सेन्सेक्स १००० अंकांहूनही अधिकच्या घसरणीसह दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच ७६,२९३.६० अंकांवर बंद झाला. व्यापारादरम्यान एक वेळ तर तो १,२८१.२१ अंकांनी घसरला होता.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीतही ३०९.८० अंकांची घसरण झाली होती. दरम्यान, बऱ्याच शेअर्समध्येही जोरदार घसरण दिसून आली. यांपैकी एक म्हणजे, मुकेश अंबानी यांची गुंतवणूक असलेल्या आलोक इंडस्ट्रीजचा शेअर (Alok Industries Share).

टेक्सटाइल क्षेत्रातील आलोक इंडस्ट्रीजचे शेअर सातत्याने फोकसमध्ये आहेत. या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. कंपनीचा शेअर आज मंगळवारी ४% पर्यंत घसरला आणि १७.३५ रुपयांच्या इंट्रा डे लोवर आला होता. हा या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक देखील आहे.

अशी आहे शेअरची स्थिती - कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३२ रुपये एवढा आहे. तर कंपनीचे मार्केट कॅप ८,६७४ कोटी रुपये आहे. कंपनीचा शेअर या वर्षात आतापर्यंत २०% तर वर्षभरात ४०% पर्यंत घसरला आहे. गेल्या सहा मिहिन्यांत हा शेअर ३५% पर्यंत घसरला.

महत्वाचे म्हणजे, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीकडे आलोक इंडस्ट्रीची ४०% एवढी हिस्सेदारी आहे. आरआयएलकडे कंपनीची ९% वैकल्पिकदृष्ट्या कन्व्हर्टेबल प्रेफरेन्शिअल शेअर आणि नॉन-कन्व्हर्टेबल रीडिमेबल प्रेफेरेन्शिअल शेअरही आहेत.

डिसेंबर तिमाहीतील निकला - टेक्सटाईल क्षेत्रातील अलोक इंडस्ट्रीजने ३१ डिसेंबर, २०२४ ला संपलेल्या तिमाहीत ₹२७३ कोटी रुपयांचा एकत्रित तोटा नोंदवला आहे. तर गेल्या वर्षाच्या समान तिमाहीत ₹२२९.९२ कोटींचा तोटा झाला होता. याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित महसूल ३१.०६ टक्क्यांनी घसरून १,२५३.०३ कोटी रुपयांवरून ८६३.८६ कोटी रुपयांवर आला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)