याला म्हणतात 'मंदीतही चांदी'...! 1021 बसची ऑर्डर मिळताच शेअर बनला रॉकेट; लोकांना केलं मालामाल, तगडा आहे कंपनीचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 23:45 IST2025-02-19T23:39:43+5:302025-02-19T23:45:59+5:30

जेबीएम ऑटो लिमिटेडची उपकंपनी असलेल्या जेबीएम इकोलाइफ मोबिलिटीला पीएम ईबस सेवा योजना-II अंतर्गत ₹५५०० कोटींची ऑर्डर मिळाली आहे.

शअर बाजारात मंदीचे वातावरण असतानाच बुधवारी जेबीएम ऑटो लिमिटेडचा शेअर रॉकेट बनला आहे. कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर १९% ने वाढून ₹६७४ वर पोहोचला आहे. व्यवहार बंद होताना हा शेअर १४.०८% च्य वाढीसह ६४६.२० रुपयांवर बंद झाला.

असे आहे ऑर्डर डिटेल्स - जेबीएम ऑटो लिमिटेडची उपकंपनी असलेल्या जेबीएम इकोलाइफ मोबिलिटीला पीएम ईबस सेवा योजना-II अंतर्गत ₹५५०० कोटींची ऑर्डर मिळाली आहे.

जेबीएम इकोलाइफ मोबिलिटीने १०२१ इलेक्ट्रिक बसेसची खरेदी, पुरवठा, ऑपरेटिंग आणि देखभालीसाठी बस ऑपरेटर म्हणून काम करण्यासाठी टिंडर जिंकले आहे.

या प्रकल्पात ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC) मॉडेलमध्ये विद्युत आणि नागरी पायाभूत सुविधांचा विकासही समाविष्ट आहे. या ऑर्डरअंतर्गत गुजरात, महाराष्ट्र आणि हरियाणातील १९ शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेस पुरवल्या जातील.

जेबीएम ऑटोने अद्यापपर्यंत, भारत, यूरोप, मध्य पूर्व आणि अफ्रीकेसह इतरही काही भागात जवळपास 2000 इलेक्ट्रिक बसेस तैनात केल्या आहेत. या नव्या ऑर्डरसह कंपनीचे ऑर्डर बुक आता 11,000+ इलेक्ट्रिक बसेसपर्यंत पोहोचले आहे.

जेबीएमने दिल्ली-एनसीआर भागात जगातील सर्वात मोठी समर्पित इंटीग्रेटेड इलेक्ट्रिक बस उत्पादन सुविधा (चीन वगळता) स्थापन केली आहे. तिची २०,००० इलेक्ट्रिक बसेस एवढी वार्षिक उत्पादन क्षमता आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)