95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 22:21 IST2025-07-15T22:12:18+5:302025-07-15T22:21:37+5:30
गेल्या एका महिन्यात कंपनीचा शेअर ६ टक्क्यांहून अधिक आणि गेल्या सहा महिन्यांत ३६ टक्क्यांहून अधिक वधारला आहे...

कॉफी डे एंटरप्रायझेसचे शेअर्स सातत्याने फोकसमध्ये आहेत. आज १५ जुलै रोजी कंपनीचा शेअर १० टक्क्यांनी वधारून ३७.२५ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. या शेअरला अप्पर सर्किट लागले होते.
शेअर्समध्ये दिसत असलेल्या या वाढी मागचे एक महत्वाचे कारण म्हणजे, नव्या शेअरहोल्डिंग पॅटर्न डेटानुसार, दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांनी कंपनीतील काही हिस्सा खरेदी केला आहे.
कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, एप्रिल-जून तिमाहीच्या अखेरीस खन्ना यांचा कॉफी डे एंटरप्रायझेसमध्ये १.५५ टक्के हिस्सा आहे. जो ३२.७८ लाख शेअर्स एवढा आहे.
असे आहेत डिटेल्स - डेटा जाहीर झाल्यानंतर, कॉफी डे एंटरप्रायझेसचा शेअर्स ३७.२५ रुपयांच्या अप्पर सर्किटवर राहिला. गेल्या एका महिन्यात कंपनीचा शेअर ६ टक्क्यांहून अधिक आणि गेल्या सहा महिन्यांत ३६ टक्क्यांहून अधिक वधारला आहे.
तसेच, 2025 मध्ये आतापर्यंत हा शेअर जवळपास 57 टक्क्यांनी वधारला आहे. वर्षभराचा विचार करता, हा शेअर 30% ने घसरला आहे. तसेच दीर्घकाळात हा शेअर तब्बल 95% ने घसरला आहे.
महत्वाचे म्हणजे, १२ जानेवारी २०१८ रोजी या शेअरची किंमत सुमारे ३५० रुपये होती. यानंतर केवळ दोनच वर्षांत म्हणजेच २०२० मध्ये, थेट १९ रुपयांवर आला होता.
आज, कंपनीच्या सुमारे ३० लाख शेअर्सची सक्रिय व्यापाऱ्यांनी खरेदी-विक्री केली, हा आकडा तिच्या १० दिवसांच्या सरासरी उलाढालीपेक्षा ३ पट अधिक आहे.
चौथ्या तिमाहीचा निकाल - मे महिन्यात, कॉफी डे एंटरप्रायझेसने आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीत ३३ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. महत्वाचे म्हणजे, हा तोटा, मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत नोंदवलेल्या ३०३ कोटी रुपयांच्या निव्वळ तोट्यापेक्षा फार कमी आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)