शेअरची कमाल...! 3 वर्षांत दिला 4000% परतावा, 4 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 20:55 IST2024-12-07T20:47:35+5:302024-12-07T20:55:40+5:30

अद्वैत इन्फ्राटेकला NRSS कडून हे मोठे कंत्राट मिळाले आहे. महत्वाचे म्हणजे हे काम कंपनीला 7 महिन्यांत पूर्ण करायचे आहे.

या वर्षात शेअर बाजारामध्ये अद्वैत इन्फ्राटेकची (Advait Infratech) कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. मात्र, गेली काही महिने स्थिर गुंतवणूकदारांसाठी चढ उताराचे राहिले आहेत. पण पुन्हा एकदा कंपनीच्या शेअरच्या कामगिरीत सुधारणा दिसून येत आहे.

या शेअरला शुक्रवारी अप्पर सर्किट लागले होते. 5 टक्क्यांच्या उसळीनंतर कंपनीच्या शेअरची किंमत बीएसईवर 1713.35 रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती. गेल्या 4 ट्रेडिंग दिवसांपासून कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागत आहे. तथापि, यानंतरही अद्वैत इन्फ्राटेकचे शेअर्स 2260 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकापासून बरेच दूर आहेत.

कंपनीला मिळालेय मोठे काम - कंपनीला ऑप्टिकल ग्राउंड वायरचा पुरवठा आणि इंस्टॉलेशनचे काम मिळाले आहे. अद्वैत इन्फ्राटेकला NRSS कडून हे मोठे कंत्राट मिळाले आहे. महत्वाचे म्हणजे हे काम कंपनीला 7 महिन्यांत पूर्ण करायचे आहे.

शेअर बाजारात जबरदस्त कामगिरी... - वर्ष 2024 मध्ये या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 187 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच, गेल्या एक वर्षापासून हा शेअर होल्ड करून ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 221 टक्के एवढा नफा मिळाला आहे.

महत्वाचे म्हणजे, अवघ्या 3 वर्षात अद्वैत इन्फ्राटेकच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 4000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या कालावधीत सेन्सेक्स 43.99 टक्क्यांनी वाढला आहे.

कंपनीने वाटले आहेत बोनस शेअर - बीएसईच्या आकडेवारीनुसार, अद्वैत इन्फ्राटेकने 2022 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिले होते. कंपनीने प्रत्येक शेअरमागे एक शेअर बोनस म्हणून दिला होता. तसेच, या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात कंपनीने एक्स-डिव्हिडंड ट्रेड केला होता. त्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना एका शेअरवर 1.50 रुपयांचा डिव्हिडंड दिला होता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)