'या' बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल ऑफर; 31 मार्चपर्यंत एफडीवर मिळेल मोठा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 05:07 PM2021-03-27T17:07:05+5:302021-03-27T17:15:57+5:30

Special offers to senior citizens from several banks : ज्येष्ठ नागरिकांना फायदा घेण्याची संधी मार्च अखेरपर्यंत आहे.

नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या काळात एसबीआय (State Bank of India), एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (Bank of Baroda) आणि बँक ऑफ बडोदा ICICI Bank यांनी मे 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ऑफर आणल्या होत्या.

सिलेक्टेड मॅच्युरिटीच्या पीरियडसह एफडीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लागू असलेल्या व्याजदरापेक्षा 0.50 टक्क्यांपर्यंतच्या अतिरिक्त व्याजाची ऑफर होती.

म्हणजे नियमित ग्राहकांच्या व्याजापेक्षा 1 टक्के अधिक व्याज मिळत होते. या ऑफरची अंतिम मुदत सध्या 31 मार्च 2021 आहे. ज्येष्ठ नागरिकांना फायदा घेण्याची संधी मार्च अखेरपर्यंत आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने ती मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढविली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ज्येष्ठ नागरिकांकडे 3 महिन्यांपर्यंतची मुदत आहे.

सध्या State Bank of India मध्ये सामान्य नागरिकांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी 5.4 टक्के व्याज लाभ मिळते. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष एफडी योजनेत एफडी घेतली तर त्याला 6.20 टक्के व्याज मिळेल. ही योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आहे.

HDFC Bank ने ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा सुरू केली. या ठेवींवर बँक 0.75 टक्के अधिक व्याज देते. एचडीएफसी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर एफडी अंतर्गत ज्येष्ठ नागरिकाने निश्चित ठेव केल्यास एफडीला लागू असलेला व्याजदर 6.25% असेल.

बँक ऑफ बडोदाच्या विशेष एफडी योजनेअंतर्गत (5 वर्षे ते 10 वर्षे) ज्येष्ठ नागरिकाने निश्चित ठेव ठेवल्यास एफडीला लागू असलेला व्याजदर 6.25 टक्के राहील.

आयसीआयसीआय बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर्स (ICICI Bank Golden Years) योजनांसाठी एक खास एफडी योजना सुरू केली. या योजनेत बँक 0.80 टक्के अधिक व्याज देत आहे. आयसीआयसीआय बँक गोल्डन ईयर एफडी योजना ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 6.30 टक्के व्याज दर देत आहे.