By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 15:08 IST
1 / 8शेअर बाजारातील 'सियाराम रिसायकलिंग इंडस्ट्रीज'च्या शेअर्समध्ये सध्या मोठी घसरण दिसून येत आहे. बुधवारी हा शेअर बीएसईवर (BSE) ३८.२८ रुपयांवर बंद झाला. विशेष म्हणजे, हा शेअर त्याच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून तब्बल ७५ टक्क्यांहून अधिक कोसळला आहे. 2 / 8८ जुलै २०२५ रोजी हा शेअर १५७ रुपयांवर होता. तो अवघ्या नऊ महिन्यांतच ३८ रुपयांवर आला आहे. परिणामी गुतंवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 3 / 8महत्वाचे म्हणजे, या भीषण घसरणीच्या काळातच दिग्गज गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांनी कंपनीतील भागीदारीतून पाय मागे घेतला आहे आणि आपली मोठी भागीदारी विकल्याचे वृत्त आहे. त्यांनी एका बल्क डीलच्या माध्यमातून तब्बल २१ लाख शेअर्सची विक्री केली. 4 / 8हे शेअर्स 'परम व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट्स'ने ३८.२० रुपये प्रति शेअर दराने खरेदी केले. सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीतील आकडेवारीनुसार, मुकुल अग्रवाल यांच्याकडे कंपनीचे २२ लाख शेअर्स होते. अर्थात कंपनीतील त्यांची भागीदारी १०.१० टक्के एवढी होती. 5 / 8त्यांच्या या शेअर विक्रीच्या निर्णयाने त्यांनी कंपनीतून जवळपास पूर्णच बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. 'सियाराम रिसायकलिंग इंडस्ट्रीज'चे मार्केट कॅप बुधवारी (25 मार्च) रोजी 83.41 कोटी रुपयांवर होते.6 / 8'सियाराम रिसायकलिंग इंडस्ट्रीज' ही जामनगरस्थित कंपनी आहे. जी प्रामुख्याने पितळ (Brass) स्क्रॅपच्या रिसायकलिंगमध्ये कार्यरत आहे. ही कंपनी पितळाचा वपर होत असलेल्या गोष्टींचे उत्पादन करते. सियाराम रिसायक्लिंग इंडस्ट्रीजच्या उत्पादनांचा एक मोठा भाग निर्यात केला जातो, यासाठी चीन ही त्यांची प्रमुख बाजारपेठ आहे.7 / 8गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये २४ टक्के, तर गेल्या सहा महिन्यांत ६२ टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप ८३.४१ कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. प्रमोटर्सकडे ५८.८४ टक्के हिस्सा असून उर्वरित ४१.१६ टक्के हिस्सा सार्वजनिक भागधारकांकडे आहे.8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)