SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 09:14 IST2025-10-25T08:49:42+5:302025-10-25T09:14:01+5:30

गेल्या एका वर्षात इक्विटी म्युच्युअल फंडांनी (Equity Mutual Funds) गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. मागील वर्षीच्या म्हणजेच २०२४ च्या दिवाळीपासून आतापर्यंत २७९ इक्विटी म्युच्युअल फंडांपैकी २७६ फंडांनी सकारात्मक परतावा दिला आहे.

गेल्या एका वर्षात इक्विटी म्युच्युअल फंडांनी (Equity Mutual Funds) गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. मागील वर्षीच्या म्हणजेच २०२४ च्या दिवाळीपासून आतापर्यंत २७९ इक्विटी म्युच्युअल फंडांपैकी २७६ फंडांनी सकारात्मक परतावा दिला आहे.

याचा अर्थ, या फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. केवळ तीन फंड असे होते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना तोटा झाला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, १० असे इक्विटी म्युच्युअल फंड्स आहेत, ज्यांनी एसआयपी (SIP) अर्थात दर महिन्याला एक निश्चित रक्कम गुंतवणाऱ्यांना वार्षिक २०% पेक्षा जास्त परतावा (XIRR) दिला आहे.

गेल्या दिवाळीपासून आतापर्यंतच्या एका वर्षात अनेक म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. 'इकोनॉमिक टाइम्स'नं दिलेल्यावृत्तानुसार हे म्युच्युअल फंड्स खालीलप्रमाणे आहेत. या म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं. पाहूया कोणते आहेत हे म्युच्युअल फंड्स.

या यादीत ग्रो मल्टीकॅप फंड (Groww Multicap Fund) सर्वात वर आहे. या फंडाने एसआयपी गुंतवणुकीवर सर्वाधिक जवळपास २६% परतावा दिला आहे. याचा अर्थ, जर तुम्ही या फंडात दर महिन्याला १०,००० रुपयांची एसआयपी केली असती, तर गेल्या दिवाळीपासून आतापर्यंत तुमच्या गुंतवणुकीचं मूल्य अंदाजे १.३६ लाख रुपये झाले असते. म्हणजेच तुमच्या गुंतवलेल्या रकमेपेक्षा जास्त नफा झाला असता.

इनवेस्को इंडिया मिडकॅप फंडाने (Invesco India Midcap Fund) देखील गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. याच कालावधीत, या फंडानं २४.६९% चा शानदार एक्सआयआरआर (XIRR) दिला. मिडकॅप फंड्स अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, ज्यांचे बाजार भांडवल (Market Capitalization) मध्यम असतं, म्हणजे त्या खूप मोठ्याही नसतात आणि खूप लहानही नसतात.

हेलिओस लार्ज अँड मिड कॅप फंड (Helios Large & Mid Cap Fund) आणि आयसीआयसीआय प्रू फ्लेक्सीकॅप फंडानं (ICICI Pru Flexicap Fund) देखील गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. त्यांनी अनुक्रमे २३.८२% आणि २३.२२% चा एक्सआयआरआर (XIRR) दिला. फ्लेक्सीकॅप फंडांचे वैशिष्ट्य हे असते की, फंड व्यवस्थापक कोणत्याही आकाराच्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी स्वतंत्र असतात, मग ती लार्ज-कॅप (Large-Cap) असो, मिड-कॅप (Mid-Cap) असो किंवा स्मॉल-कॅप (Small-Cap).

मोतीलाल ओसवाल लार्ज अँड मिडकॅप फंडानं (Motilal Oswal Large & Midcap Fund) २२.३३% चा एक्सआयआरआर (XIRR) दिला. जर एखाद्यानं या फंडात दर महिन्याला १०,००० रुपयांची एसआयपी (SIP) केली असती, तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य अंदाजे १.३३ लाख रुपये झालं असतं. हे दर्शविते की एसआयपीद्वारे दीर्घकाळात चांगली रक्कम कशी जमा केली जाऊ शकते.

कोटक फोकस्ड फंडाने (Kotak Focused Fund) देखील २२.०६% चा एक्सआयआरआर (XIRR) नोंदवला. फोकस्ड फंड्समध्ये फंड व्यवस्थापक काही निवडक स्टॉक्समध्येच गुंतवणूक करतात, ज्यामुळे त्यांचा फोकस टिकून राहतो. याव्यतिरिक्त, मिराए ॲसेट मिडकॅप फंडाने (Mirae Asset Midcap Fund) २०.५५% चा एक्सआयआरआर दिला. त्यानंतर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या (ICICI Prudential Mutual Fund) दोन फंडांनीही २०% चा आकडा पार केला.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीवर अवलंबून असते. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)