जितकी सॅलरी तितकीच अतिरिक्त कमाई..समजलं नाही?; जाणून घ्या हा सीक्रेट फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 12:41 PM2023-09-11T12:41:12+5:302023-09-11T12:52:18+5:30

जर एखाद्याला सांगितले गेले की, तुम्हाला जेवढा पगार आहे तितकेच अतिरिक्त कमाई तुम्ही करू शकता तर तुम्हीही विचारात पडाल. दर महिन्याला तुम्ही इतर अतिरिक्त मार्गांनी पगारापेक्षा जास्त कमाई करू लागाल. यावर सर्वांना एकच प्रश्न पडेल की हे कसे शक्य आहे? वास्तविक, यामागे एक स्पेशल फॉर्म्युला काम करतो. तुम्ही खासगी नोकरीत असाल तर तुम्हाला हे गणित समजून घेणं खूप गरजेचं आहे.

तुम्ही तुमच्या पगाराइतके वेगळे उत्पन्न मिळवू शकता. उदाहरणार्थ, जर तुमचा मासिक पगार ५० हजार रुपये असेल आणि तुम्हाला दरमहा ५० हजार रुपये वेगळे उत्पन्न हवे असेल, तर तुम्हाला पगाराच्या किमान ३० टक्के रक्कम गुंतवावी लागेल हे समजून घ्या.

म्हणजेच दरमहा ५० हजार रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पगारातील ३० टक्के बचत करावी लागेल, जी दरमहा १५ हजार रुपये येते. आता हे पैसे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवले जाऊ शकतात, जिथे चांगले परतावा मिळण्याची आशा आहे.

एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने दर महिन्याला १५००० रुपयांची एसआयपी केली तर त्याला १० वर्षांत सुमारे ४१,७९,८५९ रुपये म्हणजेच १५ टक्के परतावा मिळू शकतो. याबाबत आणखी विस्तृतपणे आपण माहिती जाणून घेऊ.

आपण हे अधिक सोप्या पद्धतीने समजून घेऊया, जर तुम्ही दर महिन्याला SIP मध्ये १५००० हजाराची गुंतवणूक केली तर ५ वर्षांनंतर ही रक्कम सुमारे १३.५ लाख होईल. पुढील तीन वर्षांसाठी गुंतवणूकदाराने याच पद्धतीने अधिक पैसे जमा केल्यास, ८ वर्षांनी जमा केलेले भांडवल सुमारे २८ लाख रुपये होईल आणि १० मध्ये ही रक्कम ४१,७९,८५९ रुपये होईल.

हे फक्त सुरुवातीच्या पगारानुसार अंदाज आहे. बहुतेक लोकांचा पगार ७ ते ८ वर्षात दुप्पट होतो. जर पगारात वार्षिक १० टक्के वाढ झाली, तर दरमहा ५० हजार रुपये कमावणाऱ्या व्यक्तीचा पगार ८ वर्षांत 1 लाख रुपयांपेक्षा जास्त होईल.

जर गुंतवणूकदाराने वाढत्या पगारासह गुंतवणुकीची रक्कम वाढवली तर १० व्या वर्षी गुंतवणूकदार त्याच्या पगारातून दरमहा ३५३६९ रुपये वाचवण्यास सुरवात करेल. म्हणजेच, जर ५० हजार रुपये पगार असलेली व्यक्ती दरमहा १५००० रुपयांसह एसआयपी सुरू करते, तर १० व्या वर्षी गुंतवणूकदाराकडून एसआयपीची रक्कम ३५ हजार रुपये होईल.

त्यानुसार १० वर्षात १५ टक्के वार्षिक परताव्यावर एकूण रक्कम ५९,३६,१२९ रुपये होईल. जर आपण हा ट्रेंड १५ वर्षे चालू ठेवला तर आपल्याला एकूण १,६६,४९,९९२ रुपये मिळतील. आता तुम्ही समजू शकता की दर महिन्याला तुमच्या पगारातील ३० टक्के बचत करून तुम्ही १० ते १५ वर्षांत किती मोठी रक्कम जमा करू शकता.

वरच्या फॉर्म्युल्यानुसार, जेव्हा तुम्ही तुमच्या पगाराच्या ३० टक्के रक्कम १० वर्षांसाठी गुंतवता तेव्हा तुमच्याजवळ सुमारे ६० लाख रुपये असतील. तर १५ वर्षात हीच रक्कम १.६६ कोटी रुपये होईल. आता कल्पना करा की ही रक्कम थेट बँकेत फिक्स डिपॉझिट (FD) म्हणून जमा केल्यास तुम्हाला दरमहा १ लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल. म्हणजेच या मार्गाने तुम्हाला तुमच्या पगाराएवढे उत्पन्न मिळू लागेल.

याशिवाय पगार जास्त वाढला तर बचतही जास्त होईल, जी तुम्ही इतरत्र गुंतवू शकता. जसे स्टॉक मार्केट, PPF, गोल्ड बॉण्ड्स, रिअल इस्टेट आणि शॉर्ट टर्म फंड. १० ते १५ वर्षांनंतर तुम्ही या ठिकाणांहून परतावा मोजाल तेव्हा तुम्हाला तुमच्या पगाराला हात लावण्याची गरज भासणार नाही. कारण गुंतवणुकीतून तेवढेच उत्पन्न मिळू लागेल.