युद्धामुळे गुंतवणूक 'स्ट्रॅटेजी' बदलावी का? आधी समजून घ्या, ६०-२०-१०-१० अन् ३०-३०-४० फॉर्म्युला! मगच निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 07:58 IST2026-03-16T07:46:53+5:302026-03-16T07:58:57+5:30
इतिहासात अनेकदा असे दिसले आहे की मोठ्या युद्धांनंतर किंवा संकटांनंतर बाजार पुन्हा उभा राहिला आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी भावनिक निर्णय टाळणे अत्यंत महत्त्वाचे असते....

जागतिक राजकारणात एखादा मोठा संघर्ष सुरू झाला की त्याचे परिणाम केवळ रणांगणावरच दिसत नाहीत, तर ते थेट अर्थव्यवस्थेवर आणि शेअर बाजारावरही उमटतात. सध्या इराण–अमेरिका संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत, जागतिक गुंतवणूकदार सावध झाले आहेत आणि अनेक शेअर बाजारात घसरण दिसू लागली आहे. अशा परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदारांच्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो की आता आपला गुंतवणुकीचा गेम प्लॅन बदलावा का?

तर त्याचे सरळ असेच उत्तर आहे, हो! कारण परिस्थितीनुसार काही योग्य बदल किंवा बॅलेन्स करणे योग्य ठरते. इतिहास सांगतो की युद्धामुळे बाजारात अल्पकालीन अस्थिरता निर्माण होते, पण दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी संधीही निर्माण होते. गुंतवणुकीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धैर्य आणि शिस्त. बाजारात अस्थिरता येते, युद्धे होतात, आर्थिक संकटे येतात-दीर्घकालीन गुंतवणूकदार संयम ठेवतात.

गुंतवणूकदारांनी काय करू नये? सर्वात मोठी चूक म्हणजे घाबरून निर्णय घेणे. अनेक गुंतवणूकदार बाजार पडताना घाईघाईने शेअर्स विकतात आणि नंतर बाजार परत वाढल्यावर त्यांना पश्चात्ताप होतो.

इतिहासात अनेकदा असे दिसले आहे की मोठ्या युद्धांनंतर किंवा संकटांनंतर बाजार पुन्हा उभा राहिला आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी भावनिक निर्णय टाळणे अत्यंत महत्त्वाचे असते.

नकारात्मक परिणाम कशावर ? 1. विमान कंपन्या : इंधन खर्च वाढल्यामुळे त्यांचा खर्च वाढतो. 2. रसायन उद्योग : तेलाशी संबंधित कच्चा माल महाग होतो. उत्पादन खर्च वाढतो. 3. लॉजिस्टिक्स आणि वाहतूक : इंधन दर वाढल्यामुळे वाहतूक खर्च वाढतो. पेंट उद्योग : या उद्योगात तेलावर आधारित कच्चा माल वापरला जातो.

६०-२०-१०-१० नियम अस्थिर काळात गुंतवणुकीचे संतुलन ठेवणे महत्त्वाचे असते. त्यासाठी एक सोपा फॉर्मुला वापरला जातो.

युद्धकाळात फायदेशीर क्षेत्र कोणती? 1. ऊर्जा आणि तेल क्षेत्र : तेलाच्या किंमती वाढल्यास तेल कंपन्यांचे उत्पन्न वाढू शकते. 2. संरक्षण उद्योग : युद्धामुळे संरक्षण खर्च वाढतो. त्यामुळे संरक्षण उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो.

3. सोने : संकटकाळात गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. 4. जहाज वाहतूक आणि लॉजिस्टिक्स : काही वेळा पुरवठा साखळीत बदल झाल्यामुळे या क्षेत्रालाही फायदा होऊ शकतो.

३०-३०-४० चा फॉर्म्युला काय आहे? बाजार पडत असताना एकाच वेळी गुंतवणूक करण्याऐवजी ती तीन टप्प्यांत करणे अधिक सुरक्षित.

गुंतवणुकीत कोणते बदल कराल? पूर्ण पोर्टफोलिओ बदलण्याऐवजी काही छोटे आणि विचारपूर्वक बदल करणे योग्य ठरते. - काही प्रमाणात रोख रक्कम ठेवणे : अस्थिर बाजारात संधी अचानक निर्माण होतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओमध्ये साधारण १० ते २० टक्के रोख रक्कम किंवा लिक्विड फंड ठेवणे फायदेशीर ठरू शकते. बाजार पडल्यावर ही रक्कम वापरून चांगले शेअर्स स्वस्तात खरेदी करता येतात.

सोन्यात थोडी गुंतवणूक वाढवणे : जागतिक संकटांच्या काळात सोने सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अशा काळात सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता असते. गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफ, सॉव्हरिन गोल्ड बाँड, गोल्ड म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओमध्ये ५ ते १० टक्के सोने ठेवून संतुलन ठेवू शकतात.

एसआयपी थांबवू नये : अनेक गुंतवणूकदार बाजार पडल्यावर एसआयपी बंद करतात. पण हा निर्णय अनेकदा चुकीचा ठरतो. बाजार खाली असताना एसआयपी सुरू ठेवणे फायदेशीर असते.

हे ठरेल उपयुक्त : पोर्टफोलिओमध्ये संतुलन ठेवणे, काही प्रमाणात रोख रक्कम ठेवणे, सोन्यात थोडी गुंतवणूक वाढवणे, एसआयपी सुरू ठेवणे, दीर्घकालीन दृष्टी ठेवणे, संयम ठेवणे, नियोजन करणे

















