कंपनीला मिळाली ₹501 कोटींची ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उडाली एकच झुंबड; रेखा झुनझुनवालांकडे 6 कोटी शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 19:43 IST2025-01-07T19:36:39+5:302025-01-07T19:43:35+5:30
कंपनीचा शेअर 6% पर्यंत वधारून 274.95 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला होता...

शेअर बाजारात एनसीसी लिमिटेडचा शेअर आज मंगळवाच्या व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होता. कंपनीचा शेअर 6% पर्यंत वधारून 274.95 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला होता.
खरे तर, एका मोठ्या घोषणेनंतर शेअरमध्ये ही तेजी दिसून आली आहे. कंपनीने बेंगळुरू सबअर्बन रेल्वे प्रोजेक्टसाठी 8 स्टेशन्ससाठी ₹501 कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली आहे. जे 24 महिन्यांच्या आत कार्यान्वित करयाचे आहेत.
असे आहेत डेटेल्स - कंपनीने फायलिंगमध्ये म्हटले आहे की, NCC ला रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी (कर्नाटक) लिमिटेडकडून 501 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे (सर्व कर आणि GST सहित).
याशिवाय, नोव्हेंबर 2024 मध्ये, कंपनीला केन-बेतवा प्रकल्प प्राधिकरणाकडून ईपीसी प्रकल्पासाठी ऑर्डर मिळाली होती. याची किंमत 3389.49 कोटी रुपये एवढी होती. तसेच, डिसेंबर 2024 मध्ये, NCC ला एका खाजगी कंपनीकडून 349.70 कोटी रुपयांची बांधकामाशी संबंधित ऑर्डर मिळाली होती.
रेखा झुनझुनवालांकडे मोठी हिस्सेदारी - एनसीसी लिमिटेडमध्ये रेखा झुनझुनवाला यांची मोठी गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे कंपनीची 10.63 टक्के हिस्सेदारी अर्थात जवळपास 6,67,33,266 शेअर आहेत.
महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षभरात हा शेअर जवळपास 60% पर्यंत वधारला आहे. गेल्या पाच वर्षांत या शेअरमध्ये जवळपास 390% पर्यंतची तेजी दिसून आली आहे.
एनसीसी ही 1990 मध्ये लिमिटेड कंपनी बनली होती आणि 1992 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट झाली होती. हिचे मार्केट कॅप 17,102.54 कोटी रुपये एवढे आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)