याला म्हणतात परतावा...! ₹2 शेअर ₹1300 वर पोहोचला, 50000%ची तुफान तेजी; गुंतवणूकदारांना केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 20:27 IST2024-12-18T20:19:31+5:302024-12-18T20:27:30+5:30

गेल्या 20 वर्षाचा विचार करता, या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्समध्ये 190300% एवढी प्रचंड वाढ झाली आहे...

स्पेशॅलिटी केमिकल्स उद्योगाशी संबंधित कंपनी ज्योती रेजिन्स अँड ॲडेसिव्हजच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

गेल्या 10 वर्षांत ज्योती रेजिन्स आणि ॲडेसिव्हजच्या शेअरने 50,000% हून अधिक परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर 2 रुपयांवरून 1300 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सना बोनस शेअरही दिले आहेत.

50116% ने वधारला आहे शेअर - ज्योती रेजिन्स अँड ॲडेसिव्हजचा शेअर गेल्या 10 वर्षांत 50116% ने वधारला आहे. हा शेअर 19 डिसेंबर 2014 रोजी 2.73 रुपयांवर होते. जो 18 डिसेंबर 2024 रोजी 1370.90 रुपयांवर बंद झाले.

गेल्या 20 वर्षाचा विचार करता, या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्समध्ये 190300% एवढी प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी 1635 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची निम्न पातळी 1181.05 रुपये आहे.

5 वर्षांत 2527% ची तेजी - ज्योती रेजिन्स अँड ॲडेसिव्हच्या शेअर्समध्ये गेल्या 5 वर्षांत 2527% ची वाढ झाली आहे. ज्योती रेजिन्सचा शेअर 20 डिसेंबर 2019 रोजी 52.18 रुपयांवर होते. जो 18 डिसेंबर 2024 रोजी 1370.90 रुपयांवर बंद झाला.

दिले आहेत दोन बोनस शेअर - ज्योति रेजिन्स अँड ॲडेसिव्हने सप्टेंबर 2022 मद्ये आपल्या भागधारकांना बोनस शेअरचे गिफ्ट देखील दिले होते. तेव्हा कंपनीने 2:1 या रेशोमध्ये बोनस शेअर दिले होते. अर्थात, कंपनीने प्रत्येक एका शेअरवर 2 बोनस शेअर दिले होते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)