शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खूशखबर! SBI ग्राहकांसाठी 7 एप्रिलपर्यंत बंपर ऑफर; खरेदीवर मिळणार 50 टक्के डिस्काऊंट, कॅशबॅक अन् बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 3:24 PM

1 / 12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय (State Bank of India) ने ग्राहकांसाठी योनो शॉपिंग कार्निवल (YONO shopping carnival) आणले आहे. बँकेच्या या ऑफरमध्ये ग्राहकांना स्वस्त खरेदी करण्याची संधी मिळेल.
2 / 12
4 एप्रिलपासून हे कार्निवल सुरू होईल आणि 7 एप्रिल 2021 पर्यंत असणार आहे. एसबीआयच्या बँकिंग सेवा आणि योनो प्लॅटफॉर्मवर खरेदी केल्यावर सवलतीचा फायदा ग्राहकांना मिळेल. याशिवाय कॅशबॅकची सुविधादेखील देण्यात येणार आहे.
3 / 12
बँकेने या ऑफरला योनो सुपर सेव्हिंग डे (YONO Super Saving Days) असं नाव दिलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2021 मध्ये झालेल्या शॉपिंग कार्निव्हलच्या दुसर्‍या आवृत्तीत ग्राहकांचा मोठा पाठिंबा होता, त्यामुळे बँकेने तिसरी आवृत्ती आणली.
4 / 12
मार्चमध्ये 4 ते 7 मार्च 2021 दरम्यान कार्निवल आयोजित करण्यात आलं होतं. कार्निवलच्या व्यवहारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना पैसे भरण्यासाठीही मोठ्या ऑफर करत आहेत.
5 / 12
तुम्हीही युनो एसबीआय Appवर जर यूपीआयमार्फत पैसे भरले तर कॅशबॅक बक्षीस (UPI karo, reward jeeto!) अशी खास सुविधा तुम्हाला मिळणार आहे. या खास सेलमध्ये ग्राहकांना 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे.
6 / 12
मोठ्या प्रमाणात फायदे देण्यात आले आहेत. बँकेने या सेलमध्ये बड्या ब्रॅन्डससोबत टायअप केलं आहे. यामध्ये अ‍ॅमेझॉन, अपोलो 24×7, ईजीमायट्रिप, ओयो आणि @होम सारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे.
7 / 12
जर तुम्ही आरोग्यासंबंधी काही वस्तू खरेदी करणार असाल किंवा हॉटेल बुकिंग, फ्लाईट्स बुकिंग अशा सेवांचा लाभ घेणार असाल तर यामध्ये तुम्हाला तब्बल 50 टक्के सूट देण्यात आली आहे.
8 / 12
याव्यतिरिक्त अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून काही विशेष कॅटेगरीमध्ये 10 टक्क्यांचा अधिक कॅशबॅक देण्यात येत आहे. ग्राहकांना त्यामुळे याचा मोठा फायदा होणार आहे.
9 / 12
योनो शॉपिंग कार्निवलच्या खास सुविधेचा फायदा देशातील तब्बल 3.6 कोटी ग्राहक फायदा घेऊ शकणार आहेत. योनोच्या ग्राहकांना या ऑफरचा फायदा घेता येणार आहे. यासाठी तुम्ही https://sbiyono.sbi/index.html वर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. एका हिंद वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 12
स्टेट बँकेने होम लोनवरील (Home Loan) वरील कमीतकमी व्याजदरात वाढ केली आहे. SBI च्या वेबसाईटनुसार हा व्याजदर आता 6.70 टक्क्यांवरून 6.95 टक्के झाला आहे. हा नवा दर (New Interest rate) 1 एप्रिल 2021पासून लागू करण्यात आला आहे.
11 / 12
एसबीआयने (SBI) व्याज वाढविल्याने गृहकर्ज महागणार आहे. एसबीआयने कमीतकमी व्याजदरामध्ये 25 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. म्हणजेय 0.25 टक्क्यांनी व्याज दर वाढविला आहे. यामुळे भविष्यातही होम लोन महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
12 / 12
स्टेट बँकेने गेल्या मार्चमध्ये स्पेशल ऑफर देत 6.70 टक्क्यांनी कर्ज उपलब्ध केले होते. हा व्याजदर सर्वात कमी होता. आता एसबीआयने व्याजदर कमी केल्याने अन्य़ बँकाही दरवाढीच्या पावलावर पाऊल ठेवून व्याजदर वाढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
टॅग्स :SBIएसबीआयbankबँकMONEYपैसाbusinessव्यवसाय