Postal Life Insurance: जीवन विमा पॉलिसी घेणाऱ्यांसाठी खुशखबर, एकत्र भरता येणार अनेक प्रिमिअम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 03:56 PM2021-02-25T15:56:24+5:302021-02-25T16:03:27+5:30

पाहा कोणत्या आहेत या योजना, कोणता मिळतो फायदा

जर तुम्ही पोस्ट ऑफिसमधून जीवन विमा घेतला असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आता तुम्ही यासोबतच अन्य पॉलिसींच्या प्रिमिअमचेही पैसे भरू शकता.

पोस्टल लाईफ इन्शुरन्सनं ट्वीटद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसंच पोस्टल लाईफ इन्शुरन्स आणि रूरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे अनेक प्रिमिअम तुम्ही भरू शकणार आहात.

पोस्टाची इन्शुरन्स कॅटेगरी दोन भागांमध्ये विभागलेली आहे. पहिली म्हणजे PLI आणि दुसरी म्हणजे RPLI. PLI ही जुनी विमा पॉलिसी आहे.

१ फेब्रुवारी १८८४ रोजी ब्रिटीशांच्या शासन काळात ही पॉलिसी सुरू करण्यात आली होती. यापूर्वी हा विमा केवळ गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांसाठी होती.

परंतु २०१७ मध्ये PLI मध्ये येणाऱ्या सर्व पॉलिसी सर्व प्रोफेशनल लोकांसाठी आणि बीएसई, एनएसईच्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.

या अंतर्गत १० लाख रूपयांपर्यंतचा विमा घेता येतो. तर दुसरीकडे RPLI ही विमा योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे.

पीएलआय अंतर्गत सहा पॉलिसी आहेत. होल लाईफ एश्योरन्स (सुरक्षा), कन्व्हर्टिबल होल लाइफ एश्योरन्स (सुविधा), एंडोमेंट एश्योरन्स, जॉइंट लाइफ एश्योरन्स, अँटीसिपेटेड एंडोमेंट एश्योरन्स आणि चिल्ड्रन पॉलिसी या पॉलिसीचा या अंतर्गत समावेश होतो.

तर RPLI अंतर्गत लाइफ एश्योरन्स (ग्रामीण सुरक्षा), कन्व्हर्टिबल होल लाइफ एश्योरन्स (ग्रामीण सुविधा), एंडोमेंट एश्योरन्स, १० इयर्स रूरल PLI, अँटीसिपेटेड एंडोमेंट एश्योरेंस आणि चिल्ड्रन पॉलिसीचा समावेश आहे. या दोन्ही पॉलिसीमध्ये काही समान घटकही आहेत.

तुम्ही १० लाखांपर्यंत विमा घेऊ शकता. ५५ वर्षापर्यंत तुम्ही ही पॉलिसी खरेदी करू शकता.

जर सहा वर्षांपर्यंत पॉलिसी बदलण्याचा ऑप्शन पॉलिसीहोल्डरनं निवडला नाही. तर ती पॉलिसी लाईफटाईम समजली जाईल.

गरज भासल्यास यावर कर्जदेखील घेता येऊ शकतं. तीन वर्षांनंतर ही पॉलिसी सरंडरही करता येते.

जर पाच वर्षांपूर्वी ही पॉलिसी सरंडर केली आणि त्यापूर्वी कर्ज घेतलं तर पीएलआयवर बोनस मिळत नाही. पॉलिसीमध्ये नॉमिनी बदलण्याचीही सुविधा आहे.

जर तुमच्या पॉलिसीला ३ वर्षे झाली नाही आणि पॉलिसी होल्डरनं सलग सहावेळी प्रिमिअम डिफॉल्ट केला असेल तर ही पॉलिसी लॅप्स कॅटेगरीमध्ये जाईल.

पोस्टल लाईफ इन्शुरन्सवर इन्कम टॅक कायद्याअंतर्गत सूट मिळू सकते. ही पॉलिसी देशाच्या कोणत्याही सर्कलमध्ये ट्रान्सफर करता येते.

या पॉलिसीचा प्रमिअम तुम्ही वर्षाला एकत्रिक किंवा सहा महिन्यांचा एकत्रितही करू शकता.

Read in English