धागा बनवणारी कंपनी घेऊन येतेय 'आयपीओ'; किती आहे प्राईज बँड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 18:37 IST2024-12-16T18:23:36+5:302024-12-16T18:37:12+5:30
Sanathan Textiles IPO: टेक्स्टटाईल क्षेत्रातील कंपनी लवकरच आयपीओ घेऊन येणार आहे. १९ डिसेंबर रोजी सनाथन टेक्स्टटाईलचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या सनाथन टेक्स्टटाईल आयपीओबद्दल जाणून घ्या....

आयपीओच्या माध्यमातून पैसे कमावण्याची आणखी एक संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे. धागा तयार करणारी कंपनी सनाथन टेक्स्टटाईल लवकरच आयपीओ घेऊन येत आहे.
सनाथन टेक्स्टटाईलच्या आयपीओची प्राइज बँडही निश्चित झाली असून, हा आयपीओ १९ डिसेंबर रोजी गुतंवणुकीसाठी खुला होणार आहे. २३ डिसेंबरपर्यंत आयपीओ खुला असणार आहे, तर अँकर गुंतवणूकदारांसाठी १८ डिसेंबरपर्यंत खुला असणार आहे.
सनाथन टेक्स्टटाईल आयपीओचा प्राईज बँड ३०५ ते ३२१ रुपये निश्चित करण्यात आला आहे. ५५० कोटी रुपयांच्या सनाथन टेक्स्टटाईल आयपीओमध्ये ४०० कोटी फ्रेश इश्यू आणि प्रमोटर सेलिंग शेअरधारकांकडून, तर १५० कोटी ऑफर फॉर सेल असणार आहे.
गुंतवणुकदार एका लॉटमध्ये कमीत कमी ४६ शेअर खरेदी करू शकणार आहेत. कंपनी आयपीओतून येणारा पैसा कर्जाची परतफेड आणि सहायक कंपनीच्या कर्जफेडीबरोबरच गुंतवणुकीसाठी वापरणार आहे.
सनाथन टेक्स्टटाईल ही एक अशी कंपनी आहे, जी पॉलिअस्टर, कॉटन आणि टेक्निकल टेक्स्टटाईल क्षेत्रात काम करते.
कंपनीचा व्यवसाय तीन वेगवेगळ्या क्षेत्रात विभागला गेलेला आहे. यात पॉलिअस्टर उत्पादन, कॉटन उत्पादन आणि औद्योगिक उपयोगासाठी वापराला जाणारा धागा बनण्याचे काम चालते.
कंपनीचे सिल्वासामध्ये उत्पादन यूनिट असून, त्याची क्षमता २२३,७५० एमटीपीए इतकी आहे. क्रिसिलच्या रिपोर्टनुसार, भारतीय सूत उत्पादन उद्योगात कंपनीचा वाटा १.७ टक्के इतकी आहे.