₹१,००,०००, ₹२,००,००० आणि ₹५,००,००० पोस्टाच्या NSC स्कीममध्ये गुंतवले तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 08:50 IST2024-07-15T08:33:26+5:302024-07-15T08:50:50+5:30
पोस्टातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पोस्ट ऑफिस एनएससी ही एक योजना आहे जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टफोलिओचा ही एक भाग आहे. पाहूया यात तुम्हाला मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल.

हल्ली अनेकांचा कल गुंतवणूकीकडे वाढत चालला आहे. परंतु आपली गुंतवणूक ही सुरक्षित असावी, पण त्यातून जास्त फायदाही व्हावा असं सर्वांनाच वाटत असतं. पोस्टातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पोस्ट ऑफिस एनएससी ही एक योजना आहे जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टफोलिओचा ही एक भाग आहे. या योजनेत तुम्हाला ७.७ टक्के दरानं व्याज मिळत आहे.

५ वर्षांनंतर ही योजना मॅच्युअर होते, तसंच कलम ८० सी अंतर्गत यात कराचा लाभही मिळतो. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर जाणून घेऊ १ लाख रुपये, २ लाख रुपये, ३ लाख रुपये, ४ लाख रुपये आणि ५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती फायदा होईल.

जर तुम्ही या योजनेत १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ७.७ टक्के व्याजदरानं तुम्हाला ५ वर्षात ४४,९०३ रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटी ची रक्कम १,४४,९०३ रुपये होईल.

जर तुम्ही या योजनेत २ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला ५ वर्षात ८९,९८०७ रुपयांचं व्याज मिळेल. अशा प्रकारे मॅच्युरिटीची रक्कम २,८९,८०७ रुपये होईल.

३ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ५ वर्षात एकूण १,३४,७१० रुपये व्याजाद्वारे मिळतील. यानुसार ७.७ टक्के व्याजदराने मॅच्युरिटीवर तुम्हाला ४,३४,७१० रुपये मिळतील.

एनएससीमध्ये ४ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास एनएससी कॅल्क्युलेटरनुसार १,७९,६१४ रुपये फक्त व्याजामध्ये मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर एकूण ५,७९,६१४ रुपये मिळतील.

५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला खूप फायदा होईल. यामध्ये तुम्हाला २,२४,५१७ रुपये व्याज म्हणून मिळतील आणि अशा प्रकारे ५ वर्षानंतर तुमची मॅच्युरिटी रक्कम ७,२४,५१७ रुपये होईल.

















