रिटायरमेंट प्लॅनिंग पुढे ढकलाल, तर मोठ्या आर्थिक संकटात पडाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 18:46 IST2025-02-28T18:41:12+5:302025-02-28T18:46:27+5:30

Where to invest retirement money for monthly income: जितक्या लवकर तुम्ही निवृत्तीबद्दलचे आर्थिक नियोजन कराल, तितका तुमच्यावर आर्थिक ताण कमी पडेल आणि पैसे जास्त मिळतील.

लोक वेळ आल्यावर विहीर खोदायला जातात. मात्र, त्याचा मोठा फटका आपल्याला बसतो.

टियर-२ शहरांमध्ये राहणाऱ्या ८०% लोकांनी अद्याप सेवानिवृत्तीचे नियोजन केलेले नाही आणि ते निवृत्तीसाठी केवळ त्यांच्या बचतीवर आणि मुलांवर अवलंबून आहेत, असे समोर आले आहे.

अनेकांसाठी त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग घर-कार कर्जाची परतफेड करण्यासाठी जातो. मात्र, असे असले तरीही रिटायरमेंटचे नियोजन पुढे ढकलणे आपल्यासाठी संकटात टाकू शकते.

जर तुमचे वय २० ते ३० वर्षांदरम्यान असेल तर अधिक रिस्क घेत शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवा.

३० ते ५० वर्षे वय असेल तर इक्विटी आणि इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी. गुंतवणूक रक्कम वाढवत रहावी.