8000 एकर परिसर, वर्ल्ड क्लास सुविधा; मुकेश अंबानी 'या' ठिकाणी उभारताहेत त्यांची ड्रीम सिटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 04:19 PM2023-06-14T16:19:25+5:302023-06-14T16:31:07+5:30

Reliance Smart City: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स गुरुग्रामजवळ जागतिक दर्जाची स्मार्ट सिटी बनवत आहे.

Reliance Smart City : दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये जागतिक दर्जाची स्मार्ट सिटी (Reliance Smart City) उभारणार आहेत.

मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्सद्वारे ही स्मार्ट सिटी उभारली जात आहे. या शहराला मॉडेल इकॉनॉमिक टाउनशिप लिमिटेड किंवा मेट सिटी, असे नाव देण्यात आले आहे.

या प्रोजेक्टमध्ये जपानच्या 4 कंपन्या सहभागी होणार आहेत. रिलायन्सची मॉडेल इकॉनॉमिक टाउनशिप (MET) ही उत्तर भारतातील सर्वात वेगाने वाढणारी टाउनशिप आहे.

हे सर्वात वेगाने वाढणारे शहर देखील बनले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात अनेक ब्रँडच्या 450 हून अधिक कंपन्या येथे आल्या आहेत. रिलायन्सच्या एमईटी सिटीला एका वर्षात दोन पुरस्कारही मिळाले आहेत.

रिलायन्सने हरियाणातील झज्जर जिल्ह्यात 8,000 एकर जागेवर जागतिक दर्जाची ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात 1 हजार 900 एकर जागेवर शहर वसविण्याचा परवाना मिळाला आहे.

कंपनीने आतापर्यंत येथील जमिनीच्या पायाभूत सुविधांवर 8,800 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यात 5 औद्योगिक क्षेत्रे आहेत, तर 2 प्रकल्प SCO चे आहेत. आतापर्यंत येथे 25 हजार रोजगार निर्माण झाले आहेत.

रिलायन्सच्या या नव्या शहराची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची कनेक्टिव्हिटी. याची दिल्ली, गुरुग्राम, नोएडा आणि प्रदेशातील इतर शहरांशी मजबूत कनेक्टिव्हिटी आहे.

हे शहर रणनीतिकदृष्ट्या कुंडली मानेसर पलवल (KMP) एक्सप्रेसवे आणि नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ स्थित आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) च्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFC) शी रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल.