शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccine : कोरोनाची लस घेण्यासाठी Reliance Jio करणार मदत; सुरू केली जबरदस्त सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 5:44 PM

1 / 10
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु अनेकदा लोकांना स्लॉट बूक करताना समस्या निर्माण झाल्याची माहिती समोर आली होती.
2 / 10
परंतु नागरिकांच्या समस्यांकडे पाहत रिलायन्स जिओनं (Reliance Jio) एक खास सेवा सुरू केली आहे. याच्या सहाय्यानं लसीकरणाचे स्लॉट शोधण्यास मदत मिळणार आहे आणि सोपंही होणार आहे.
3 / 10
रिलायन्स जिओनं अन्य ग्राहक सेवांसोबतच आता Whatsapp चॅटबॉच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यास सुरूवात केली आहे.
4 / 10
Reliance Jio च्या या विशेष सेवेचा लाभ घेण्यासाठी आता लोकांना प्रत्येक वेळी सेशन रिफ्रेश करण्याची किंवा वन टाईम पासवर्डची गरज भारणार नाही.
5 / 10
कोणत्याही समस्येशिवाय लोकांना सहजरित्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या उपलब्धतेविषयी माहिती मिळणार आहे.
6 / 10
जिओ युझर्सना आता Whatsapp चॅटबॉद्वारे आपला फोनही रिचार्ज करता येणार आहे. तसंच यासोबत चॅटबॉट समस्यांचं निराकरणही करणार आहे. याशिवाय कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या उपलब्धतेविषयी माहिती देणार आहे.
7 / 10
रिलायन्स जिओच्या ग्राहकांना या चॅटबॉट सेवेचा फायदा घेण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये सर्वप्रथम 7000770007 हा क्रमांक सेव्ह करावा लागेल.
8 / 10
त्यानंतर Whatsapp सुरू करून जिओ चॅटबॉसोबत चॅट ओपन करावं लागेल. त्यानंतर सर्वप्रथम त्यावर Hi असं लिहून मेसेज पाठवा. त्यानंतर तुम्हाला ज्या भागात लस घ्यायची आहे त्या ठिकाणचा पिनकोड टाका.
9 / 10
दरम्यान, हा चॅटबॉट केवळ रिलायन्स जिओच्याच ग्राहकांना मदत करणार नाही, तर अन्य मोबाईल सेवांचा लाभ घेणाऱ्यांनाही मदत करणार आहे. तसंच त्यांना लसीकरणाची माहिती मिळणार आहे.
10 / 10
अनरजिस्टर्ड नंबर किंवा नॉन जिओ नेटवर्कवरून माहित घेण्यासाठी ग्राहकांची रिक्वेस्ट मिळाल्यानंतर जिओ चॅटबॉट पहिले युझरचं व्हेरिफिकेशन करणार आहे.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप