Reliance Jio चा आणखी एक धमाका, लाँच केले पाच व्हाऊचर्स; मिळणार ५६ जीबीपर्यंत डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 05:04 PM2021-03-01T17:04:26+5:302021-03-01T17:08:30+5:30

Reliance Jio : पाहा कोणते आहेत हे प्लॅन्स आणि कोणता मिळतोय फायदा

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओनं पाच नवे डेटा व्हाऊचर्स सादर केले आहेत. यांची किंमत २२ रूपयांपासून सुरू होत असून यात सर्वाधिक ५६ जीबीपर्यंत डेटाही देण्यात येत आहे.

या डेटा व्हाऊचर्सची किंमत २२ रूपये, ५२ रूपये, ७२ रूपये, १०२ रूपये आणि १५२ रूपये इतकी आहे.

जिओच्या या डेटा व्हाऊचर्सची किंमत २२ रूपयांपासून सुरू होते आणि यासोबत २८ दिवसांची व्हॅलिडिटीही देण्यात आली आहे. परंतु यासोबत कोणत्याही अन्य सुविधा म्हणजेट कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देण्यात येत नाहीत.

जर तुम्हाला डेटा कमी पडत असेल तर तुम्ही या व्हाऊचर्सचा वापर करू सकता. २२ रूपयांच्या पॅकमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी २ जीबी डेटा देण्यात येतो. परंतु सध्या हे प्लॅन्स केवळ जिओ फोन युझर्ससाठीच आहेत.

तर दुसरीकडे ग्राहकांना ५२ रूपयांच्या डेटा व्हाऊचरमध्ये ६ जीबी डेटा देण्यात येतो. यामध्ये २८ दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येते.

याव्यतिरिक्त ७२ रूपयांच्या पॅकमध्ये २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज ५०० एमबी डेटा म्हणजेच महिन्याला १४ जीबी डेटा देण्यात येतो. तर १०२ रूपयांच्या पॅकमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा देण्यात येतो.

याव्यतिरिक्त कंपनीनं १५२ रूपयांचा प्लॅनही लाँच केला आहे. यामध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी दररोज २ जीबी याप्रमाणे ५६ जीबी डेटा देण्यात येतो.

याव्यतिरिक्त कंपनीनं नुकताच जिओ फोन युझर्ससाठी ७४९ रूपयांचा ऑल इन वन प्लॅनही लाँच केला आहे.

हा प्लॅन ३३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. याव्यतिरिक्त यासोबत प्रत्येक २८ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा देण्यात येतो. महिन्याला या प्लॅनसोबत २४ जीबी डेटा मिळतो.

याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि महिन्याला ५० एसएमएसचीही सुविधा यासोबत देण्यात येते.