Reliance Jio : १ रूपया अधिक देऊन वाढेल २८ दिवसांची वैधता, रोज २ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 01:43 PM2021-06-20T13:43:50+5:302021-06-20T13:50:20+5:30

Reliance Jio : सध्या अनेक दूरसंचार कंपन्या देतायत ग्राहकांना अनेक जबरदस्त ऑफर्स. पाहा कोणते आहेत हे पॅक.

सध्या एअरटेल (Airtel), रिलायन्स जिओ (Reliance Jio), व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या कंपन्या ग्राहकांना अनेक जबरदस्त प्लॅन्स ऑफर करत आहेत. अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह कंपन्या अनेक ऑफर्स देत आहेत.

अनेकदा आलेल्या निरनिराळ्या प्लॅन्समुळे आपल्याला योग्य प्लॅन निवडणं कठीण होतं. परंतु आम्ही तुम्हाला असा एक प्लॅन सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही १ रूपया अतिरिक्त देऊन २८ दिवसांची वैधताही वाढवू शकता.

रिलायन्स जिओच्या ५९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये ५६ दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये रोज २ जीबी डेटाप्रमाणे ११२ जीबी डेटा देण्यात येतो.

यासह या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस दिले जातात.

तसंच या प्लॅनसोबत ग्राहकांना डिस्ने+ हॉटस्टारचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं. याशिवाय या प्लॅनसोबत जिओ अॅप्सचंही सबस्क्रिप्शन देण्यात येतं.

रिलायन्स जिओच्या ५९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता मिळते. याशिवाय दररोज २ जीबी याप्रमाणे ग्राहकांना १६८ जीबी डेटा मिळतो.

याशिवाय या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज १०० एसएमएस आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिगचीही सुविधा देण्यात येते. यासह कंपनी ग्राहकांना मोफत जिओ अॅप्सचंही सबस्क्रिप्शन देते.

रिलायन्स जिओच्या ५९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ५६ दिवसांची वैधता मिळते. तर दुसरीकडे तुम्हाला केवळ १ रूपया अतिरिक्त देऊन ५९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते.

दोन्ही प्लॅन्सचे काही नुकसान आणि फायदेही आहेत. ५९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला वैधता कमी मिळते. परंतु तुम्हाला डिस्ने+ हॉटस्टार व्हीआयपीचं मोफत सबस्क्रिप्शन मिळतं.

तर दुसरीकडे ५९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अधिक वैधता मिळते. परंतु यामध्ये तुम्हाला डिस्ने+ हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन मिळत नाही. त्यामुळे जर तुम्हाला या अॅपचं सबस्क्रिप्शन नको असेल तर तुम्ही ५९९ रूपयांच्या प्लॅनचा विचार करू शकता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!