शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय म्हणता...! अदानी अंबानी ठरले अधिक श्रीमंत, Mark Zuckerberg ना टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 2:41 PM

1 / 11
टेक कंपनी मेटाचे (Meta Formerly known as Facebook) मालक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या संपत्तीत गुरुवारी तब्बल २९ अब्ज डॉलर्सची घट झाली. ही एकाच दिवसातील संपत्तीतील सर्वात मोठी घसरण आहे. शेअर्सच्या किंमतीत झालेल्या घसरणीनंतर मार्क झुकरबर्ग यांच्या मालमत्तेतही मोठी घसरण झाली आहे.
2 / 11
मार्क झुकरबर्ग यांच्या वैयक्तिक संपत्तीत २९ अब्ज डॉलरची घट झाली आहे. मेटाच्या शेअर्सच्या किमतीत २६ टक्क्यांची घसरण झाल्यामुळे कंपनीच्या एकूण बाजार मूल्यात २०० अब्ज डॉलर्ची घसरण झाली.
3 / 11
ही अमेरिकन कंपनीसाठी एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे. गेल्या वर्षीच कंपनीच्या नावात बदल करून फेसबुक (Facebook) ऐवजी ते मेटा (Meta) करण्यात आलं होतं.
4 / 11
फोर्ब्स मासिकानुसार, या घसरणीमुळे मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती ८५ अब्ज डॉलर्सवर आली आहे. तर दुसरीकडे त्याच दिवशी अब्जाधीश आणि अॅमेझॉन (Amazon) चे प्रमुख जेफ बेझोस यांच्या संपत्तीत २० अब्ज डॉलर्सची वाढ झाली.
5 / 11
जेफ बेझोस यांची ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनमध्ये सुमारे ९.९ टक्के भागीदारी आहे. अॅमेझॉनला अलीकडेच इलेक्ट्रीक वाहन निर्माती कंपनी रिव्हियनमधील गुंतवणुकीचा फायदा झाला आणि त्याचा चौथ्या तिमाहीचा नफा वाढला.
6 / 11
यासोबतच कंपनीने अमेरिकेतील प्राईम व्हिडीओ सेवेच्या सबस्क्रिप्शनची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली.
7 / 11
फोर्ब्स मासिकानुसार, बेझोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि २०२१ मध्ये, बेझोस यांची संपत्ती मागील वर्षाच्या तुलनेत ५७ टक्क्यांनी वाढून १७७ अब्ज डॉलर्स झाली आहे. झुकेरबर्ग यांचे एका दिवसात झालेले नुकसान हे एका दिवसातील सर्वात मोठे नुकसान ठरले आहे.
8 / 11
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क यांना एका दिवसात ३५ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. मस्क यांनी आपल्या ट्वीटरवर अकाऊंटवरून टेस्लाचे १० टक्के शेअर्स विक्री करण्याबाबत विचारलं होतं.
9 / 11
त्यानंतर त्यांच्या कंपनीचे शेअर गडगडले होते. त्या घसरणीतून कंपनीचे शेअर्स अद्याप सावरलेले नाहीत. मस्क यांनी याआधी एकाच दिवसात २० ट्रिलियन रुपयेदेखील कमावले होते.
10 / 11
गुरुवारी झालेल्या घसरणीनंतर मार्क झुकरबर्ग आता फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत १२ व्या क्रमांकावर गेले आहेत. सध्या त्यांच स्थान भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्याही खाली आलं आहे.
11 / 11
मात्र, या धक्क्यातून कंपनीचे शेअर्स लवकरच सावरणार असल्याने झुकेरबर्गचे हे नुकसान कागदावरच राहणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. गेल्या वर्षी, झुकरबर्ग यांनी ४.४७ अब्ज डॉलर्स किमतीचे मेटा शेअर्स विकले होते.
टॅग्स :AdaniअदानीMukesh Ambaniमुकेश अंबानीMark Zuckerbergमार्क झुकेरबर्गForbesफोर्ब्स