टाटा की अंबानी? कोण देतं सरकारला जास्त कर? सर्वाधिक कॉर्पोरेट टॅक्स भरणाऱ्या टॉप १० कंपन्यांची यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 16:09 IST2026-02-16T15:37:39+5:302026-02-16T16:09:57+5:30
Highest Corporate Taxpayers : भारतातील कॉर्पोरेट करदात्यांच्या यादीत कोणती कंपनी अव्वल स्थानावर आहे, माहिती आहे का?

जसा सामान्य नागरिक आपल्या उत्पन्नावर 'इनकम टॅक्स' भरतो, तसाच कंपन्यांना त्यांच्या नफ्यावर सरकारला जो कर द्यावा लागतो, त्याला 'कॉर्पोरेट टॅक्स' म्हणतात.

'हुरुन इंडिया २०२४' च्या अहवालानुसार, मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतात सर्वाधिक कॉर्पोरेट टॅक्स भरणारी कंपनी ठरली आहे.

बाजारमूल्यानुसार देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये तब्बल २५,७०७ कोटी रुपये टॅक्स म्हणून सरकारला दिले आहेत.

रिलायन्सचा हा टॅक्स त्यांच्या ऑईल, पेट्रोकेमिकल्स, रिटेल आणि टेलिकॉम (जिओ) यांसारख्या अवाढव्य व्यवसायांमधून मिळालेल्या नफ्यावर आधारित आहे.

रिलायन्सनंतर आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीसीएसने १५,८९८ कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स भरला आहे.

अनिल अग्रवाल यांची वेदांता लिमिटेड ही कंपनी तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी अंदाजे १२,८२६ कोटी रुपये टॅक्स स्वरूपात जमा केले आहेत.

सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या पहिल्या १० कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक आणि बजाज फायनान्स यांसारख्या बँकिंग आणि आयटी कंपन्यांचा समावेश आहे.

याशिवाय आयटीसी, एचसीएल टेक आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्या देखील भारताच्या तिजोरीत सर्वाधिक कर जमा करणाऱ्या टॉप १० कंपन्यांच्या यादीत मानाचे स्थान राखून आहेत.

















