Railwayच्या 10 शेअर्सची कमाल, लोकांना केलं मालामाल; 6 महिन्यात दिला 100 टक्क्यांहून अधिक परतावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 03:31 PM2023-09-05T15:31:40+5:302023-09-05T15:50:18+5:30

रेल्वेच्या 10 शेअर्सनी गेल्या केवळ 6 महिन्यांतच आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

रेल्वेच्या काही शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे. आज आम्ही आपल्याला अशाच काही शेअर्ससंदर्भात माहिती देणार आहोत. रेल्वेच्या 10 शेअर्सनी गेल्या केवळ 6 महिन्यांतच आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. यात टिटागड रेल्वे सिस्टिम्स आणि IRFC सह अनेक रेल्वे स्टॉकचा समावेश आहे.

Rail Vikas Nigam Ltd - रेल्वे विकास निगम लिमिटेडचा शेअर आज 2.98 टक्क्यांच्या वाढीसह 159.00 वर पोहोचला आहे. गेल्या 6 महिन्यांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 143.12 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

Titagarh Rail Systems टीटागड रेल सिस्टिमच्या शेअरमध्ये आज 1.25 टक्के अर्थात 10.45 रुपयांची वाढ दिसून येत आहे. या कंपनीचा स्टॉक 844.25 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीचा शेअर 80.63 टक्क्यांपर्यंत वधारला आहे.

Rail India Technical and Economic Service रेल्वे इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसचा शेअर आज 1.23 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. या शेअरची किंमत 520.10 च्या पातळीवर आहे. हा स्टॉक 6 महिन्यांच्या कालावधीत 47.82 टक्क्यांनी वधारला आहे.

RailTel RailwayTel चा शेअर आज 0.82 टक्क्यांच्या वाढीसह 233.55 च्या पातळीवर दिसत आहेत. 6 महिन्यांत या कंपनीचा स्टॉक 106.96 टक्क्यांनी वाढला आहे.

Indian Railway Ctrng nd Trsm Corp Ltd IRCTC च्या शेअर्समध्ये आज काही प्रमाणात घसरण बघायला मिळत आहे. हा शेअर 0.33 टक्क्यांनी घसरून 700.90 रुपयांवर आला आहे. तसेच गेल्या 6 महिन्यांत, हा शेअर 13.82 टक्के म्हणजेच 85.10 रुपयांनी वधारला आहे.

Container Corporation of India कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Concor) चा शेअर गेल्या 6 महिन्यांत 12.19 टक्के अर्थात 73.40 रुपयांनी वधारला. आज या शेअरमध्ये 0.92 टक्क्यांची घसरण बघायला मिळाली आहे.

Oriental Rail Infrastructure Limited - ओरिएंट रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शअरमध्येही आज तेजी दिसत आहे. हा शेअर आज अपर सर्किटवर पोहोचला असून 5 टक्क्यांच्या वाढीसह 85.57 रुपयांवर गेला आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत हा शेअर 59.35 टक्क्यांनी वधारला आहे.

BCPL रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर लि. बीसीपीएल रेल्वे इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा शेअर आज 3.76 टक्क्यांच्या वाढीसह 67.00 रुपयांवर आहे. गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत हा शेअर 52.27 टक्क्यांनी वधारला आहे.

Indian Railway Finance Corp Ltd - इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरमध्ये आजही अप्पर सर्किट लागले आहे. कंपनीचा शेअर आज 7.27 टक्क्यांच्या वाढीसह 71.55 च्या पातळीवर आहे. तर गेल्या 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर 153.72 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

Kernex Microsystems share - केर्नेक्स मायक्रोसिस्टम्सच्या शेअर्समध्येही आज अपर सर्किट लागले आहे. रेल्वेचा हा शेअर 4.99 टक्क्यांच्या वाढीसह 475.35 रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या 6 महिन्यांत हा शेअर 65.71 टक्क्यांनी वधारला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)