शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Post Office Scheme : ना चिंता, ना कोणतीही समस्या; पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये होणार पैसे डबल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 5:08 PM

1 / 9
पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. अनेक जणांचा कल हा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये करण्याकडे असतो. बँकांच्या तुलनेनं या ठिकाणी मिळणारे व्याजदर हे अधिक असतात.
2 / 9
जर तुम्ही कुठेतरी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल आणि सुरक्षित परतावा मिळवू इच्छित असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील.
3 / 9
तसेच आणखी बरेच फायदे मिळतील. आम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम (TD Account) बद्दल तुम्हाला सांगत आहोत. खास गोष्ट म्हणजे या स्कीममध्ये तुम्हाला बँकेपेक्षा जास्त व्याज मिळेल. या योजनेला पोस्ट ऑफिस एफडी (Post Office FD) असेही म्हणतात. पाहूया या योजनेबद्दल अधिक माहिती.
4 / 9
तुम्ही या योजनेत १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांसाठी पैसे जमा करू शकता. यामध्ये, सध्या १ वर्षाच्या मुदतीच्या FD खात्यांवर ५.५ टक्के व्याजदर उपलब्ध आहे. याशिवाय २ वर्षांच्या एफडी आणि ३ वर्षांच्या एफडीवरही ५.५ टक्के व्याजदरही उपलब्ध आहे.
5 / 9
पोस्ट ऑफिस ५ वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीवर ६.७ टक्के व्याज देत आहे. व्याज वार्षिक आधारावर दिले जाते, परंतु त्याची गणना तिमाही आधारावर केली जाते.
6 / 9
पोस्ट ऑफिसमध्ये ५ वर्षांच्या कालावधीसह टाइम डिपॉझिट खात्यात गुंतवलेली रक्कम आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत लाभासाठी पात्र आहे.
7 / 9
म्हणजेच, जर एखाद्याने १ लाख रुपयांच्या ठेवीसह ५ वर्षांच्या मुदतीची मुदत ठेव उघडली, तर ५ वर्षानंतर ६.७ टक्के वार्षिक व्याजदराने, त्या व्यक्तीला १,३९,४०७ रुपये मिळतील.
8 / 9
जर तुम्ही टाइम डिपॉझिट स्कीमच्या फायद्यांमध्ये पैसे गुंतवले आणि तुम्हाला ६.७ टक्के दराने व्याज मिळते, तर तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे १०.७४ वर्षे म्हणजे १२९ महिने लागतील.
9 / 9
या योजनेत कोणतीही व्यक्ती आपले खाते उघडू शकते. याशिवाय ३ प्रौढ व्यक्ती संयुक्त खाते (Time deposit Joint account) देखील उघडू शकतात. त्याच वेळी, पालक १० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांच्या नावावर खाते उघडू शकतात.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूकMONEYपैसा