Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक, थोड्या गुंतवणुकीत मिळेल 50 लाखांपर्यंतचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 03:18 PM2022-01-23T15:18:33+5:302022-01-23T15:36:42+5:30

Postal Life Insurance: पोस्ट ऑफिसने अनेकदा नागरिकांसाठी अनेक फायदेशीर योजना आणल्या आहेत. पोस्ट ऑफीसच्या या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो.

आजही देशातील एक मोठा वर्ग पोस्ट ऑफिस(Post Office) योजनांवर खूप विश्वास ठेवतात. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत, ज्या प्रत्येक वयोगटासाठी बनविल्या गेल्यात.

भारतीय पोस्ट ऑफिसने अनेकदा नागरिकांसाठी अनेक फायदेशीर योजना आणल्या आहेत. पोस्ट ऑफीसच्या या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो.

या सर्व योजना सरकारी असल्यामुळे या योजनांमध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस होत नाही. तुम्हालाही जोखीम न घेता सुरक्षितपणे गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिस स्कीममध्ये पैसे गुंतवू शकता.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका चांगल्या पोस्ट ऑफिस योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये पैसे गुंतवून खूप चांगला परतावा मिळू शकतो.

या योजनेचे नाव 'पोस्टल लाइफ इन्शुरन्स' (Postal Life Insurance) आहे. या योजनेद्वारे, गुंतवणूकदार 50 लाखांपर्यंतच्या कव्हरेजसह इतर अनेक फायदे मिळवू शकतो.

पोस्ट ऑफिस लाइफ इन्शुरन्स अंतर्गत तुम्हाला दोन श्रेणींमध्ये पैसे गुंतवण्याचा पर्याय मिळतो. PLI आणि RPLI अशी त्याची नावे आहेत. PLI अंतर्गत तुम्हाला 6 पॉलिसी पर्याय मिळतात.

या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला किमान 2 लाख आणि कमाल 50 लाखांपर्यंत PLI Sum Assured चे कव्हर मिळते. यासोबतच, व्यक्तीला 80 वर्षांपर्यंत विम्याची रक्कम मिळण्याची सुविधा आहे.

पोस्टल लाइफ इन्शुरन्सचे फायदे- तुम्ही किमान 4 वर्षांसाठी पोस्टल लाइफ इन्शुरन्स घेऊ शकता, त्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील. या पॉलिसीसह तुम्हाला निश्चित रकमेची सुविधा मिळते.

जर तुम्हाला पॉलिसी 3 वर्षांसाठी बंद करायची असेल, तर तुम्हाला पॉलिसी सरेंडर करण्याची सुविधा मिळते. यापूर्वी ही योजना फक्त सरकारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी होती.

पण आता नियमात बदल करुन डॉक्टर, इंजिनीअर, मॅनेजमेंट कन्सल्टंट, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, वकील, बँकर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

PLI होल लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी, विमाधारकाचे वय किमान 19 वर्षे आणि कमाल 55 वर्षे असावे. ही पॉलिसी घेण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइट https://pli.indiapost.gov.in वर जाऊन पॉलिसी ऑनलाइन खरेदी करू शकता.