सुरक्षित गुंतवणूक अन् दमदार परतावा; Post Office च्या 'या' योजना करतील मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 19:52 IST2025-01-12T19:48:33+5:302025-01-12T19:52:25+5:30

Post Office Savings Scheme : कलम 80C अंतर्गत या योजनेतील गुंतवणुकीवर कर सूट मिळते.

Post Office Savings Scheme : तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीसोबत चांगला परतावा मिळणारी योजना शोधत असाल, तर Post Office बचत योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. या योजना केवळ गुंतवणुकीची सुरक्षितता सुनिश्चित करत नाहीत, तर 7.5% ते 8.2% पर्यंत आकर्षक व्याजदेखील देतात. पोस्ट ऑफिसच्या अशाच 6 मोठ्या योजनांबद्दल जाणून घेऊ.

पोस्ट ऑफिस FD- पोस्ट ऑफिस एफडीमध्ये 1 ते ५ वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. 5 वर्षांच्या एफडीवर 7.5% व्याज मिळते. कलम 80C अंतर्गत या योजनेतील गुंतवणुकीवर कर सूट देखील उपलब्ध आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र- खास महिलांसाठी 2 वर्षांसाठी बनवलेल्या या योजनेत गुंतवणूक करता येते. यामध्ये 7.5५% व्याज मिळत आहे. गुंतवणुकीची मर्यादा 1,000 ते 2 लाख रुपये आहे. ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र- ही योजना 5 वर्षांच्या कालावधीसाठी आहे आणि ती 7.7% व्याज देते. कर वाचवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात गुंतवलेली रक्कम दरवर्षी चक्रवाढीने वाढते.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना- ही योजना 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. हे 5 वर्षांच्या कालावधीसाठी 8.2% व्याज देते. जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात आणि दर तिमाहीला व्याज दिले जाते.

सुकन्या समृद्धी योजना- मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या या योजनेत 8.2% व्याज मिळते. यामध्ये वार्षिक 250 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. ही योजना 15 वर्षात पूर्ण होते आणि 21 वर्षात परिपक्व होते.

किसान विकास पत्र- ही योजना 115 महिन्यांत तुमची गुंतवणूक रक्कम दुप्पट करते. हे 7.5% व्याज देते आणि किमान 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. (टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)