Post Office ची गॅरंटीड इन्कम स्कीम! छोट्या बचतीत मोठा फायदा; रोज ₹५० ची गुंतवणूक मिळेल १ लाखांपेक्षा अधिक फंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 08:49 IST2025-02-17T08:17:03+5:302025-02-17T08:49:02+5:30

Post Office Savings Scheme: पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक करणं सर्वांनाच आवडतं. होय, जर तुम्ही ५० रुपयांची बचत केली तर तुम्ही अवघ्या काही वर्षांत श्रीमंत होऊ शकता. जाणून घेऊ या स्कीमबद्दल अधिक माहिती.

Post Office Savings Scheme: पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक करणं सर्वांनाच आवडतं. होय, जर तुम्ही ५० रुपयांची बचत केली तर तुम्ही फक्त ५ वर्षात श्रीमंत होऊ शकता. त्यामुळे मॅच्युरिटीचं संपूर्ण गणित आपण इथे समजून घेऊ. पोस्ट ऑफिसबचत योजनांना सरकारचे पाठबळ असते, ज्यामुळे गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित होते.

दररोज थोडी फार रक्कम गुंतवून तुम्ही कालांतरानं मोठी रक्कम जमा करू शकता. होय, कमी गुंतवणुकीत तुम्ही सहज मोठा फंड तयार करू शकता. तुम्हाला हवं असेल तर फक्त ५० रुपयांची बचत करून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. होय, जर तुम्ही दररोज ५० रुपयांची बचत केली तर ५ वर्षात तुम्ही १,०७,०५० रुपयांपर्यंत कमावू शकता.

पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये दरमहा १५०० रुपये गुंतवल्यास ५ वर्षात एकूण ९० हजार रुपये सहज जमा होतील. यात तुम्हाला जवळपास १७,०५० रुपयांचं अतिरिक्त व्याज मिळेल.

त्याचबरोबर ५० ऐवजी १०० रुपयांची बचत केल्यास फंड दुप्पट होतो. होय, जर तुम्ही दररोज १०० रुपयांची बचत केली तर तुम्ही ५ वर्षात २,१४,०९७ रुपयांची मोठी रक्कम जमवू शकता.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजनेवर वर्षाला ६.७ टक्के व्याज मिळतं, ज्यामुळे ती मुदत ठेवी आणि इतर योजनांपेक्षा आकर्षक ठरते. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) योजनेवर किमान १२ हप्ते जमा केल्यानंतर तुम्ही तुमच्या डिपॉझिट रकमेच्या ५० टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकता.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजनेचा कालावधी ५ वर्षांचा असून, तो पुढील ५ वर्षांसाठीही वाढवला जाऊ शकतो. गुंतवणुकीसाठी खास समजल्या जाणाऱ्या या योजनेत गरज पडल्यास ३ वर्षांनंतर खातं बंद केलं जाऊ शकतं, मात्र व्याजदर बचत खात्यानुसार असेल.

जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुम्ही कलम ८० सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. ही योजना आपल्याला नियमित बचत करण्यास आणि आर्थिक शिस्त राखण्यास मदत करते. पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडणं खूप सोपं आहे, त्यासाठी फक्त आधार, पॅन कार्ड आणि किमान आवश्यक आहे.