Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक

By जयदीप दाभोळकर | Updated: November 11, 2025 09:20 IST2025-11-11T09:08:32+5:302025-11-11T09:20:46+5:30

Post Office Scheme: पोस्ट ऑफिस देशातील सामान्य नागरिकांच्या गरजांवर आधारित आणि प्रत्येक वर्गासाठी अनेक प्रकारच्या बचत योजना चालवत आहे. पाहूया कोणती आहे ही स्कीम ज्यात तुम्ही मोठी रक्कम मिळवू शकता.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिस देशातील सामान्य नागरिकांच्या गरजांवर आधारित आणि प्रत्येक वर्गासाठी अनेक प्रकारच्या बचत योजना चालवत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये टीडी (TD), आरडी (RD), एमआयएस (MIS), पीपीएफ (PPF), सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) अशा अनेक वेगवेगळ्या योजनांमध्ये खातं उघडता येतं.

आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एमआयएस (MIS - मंथली इनकम स्कीम) बद्दल सांगणार आहोत. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा ₹५५५० चं निश्चित व्याज मिळवू शकता. होय, तुम्ही या योजनेत फक्त एकदाच गुंतवणूक करून दरमहा चांगली कमाई करू शकता.

पोस्ट ऑफिसच्या एमआयएस अंतर्गत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते, त्यानंतर तुम्हाला दरमहा निश्चित व्याज मिळत राहतं. पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेत सध्या ७.४ टक्के दराने वार्षिक व्याज मिळत आहे.

मंथली इनकम स्कीम मध्ये कमीतकमी ₹१००० ची एकरकमी गुंतवणूक केली जाऊ शकते. तर, तुम्ही यात ₹९ लाख पर्यंत जास्तीत जास्त गुंतवणूक देखील करू शकता. पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेअंतर्गत, संयुक्त खात्यात (Joint Account) जास्तीत जास्त ₹१५ लाख जमा करता येतात. एमआयएस योजनेअंतर्गत, संयुक्त खात्यात जास्तीत जास्त ३ लोकांना समाविष्ट केले जाऊ शकतं.

जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीम मध्ये ₹९ लाख जमा केले, तर तुम्हाला ५ वर्षांपर्यंत दरमहा ₹५५५० चं निश्चित व्याज मिळण्यास सुरुवात होईल. व्याजाचे पैसे थेट तुमच्या बचत खात्यात (Savings Account) ट्रान्सफर केले जातील.

पोस्ट ऑफिसची एमआयएस योजना ५ वर्षांत मॅच्युअर (Mature) होते. मॅच्यॉरिटीनंतर, तुमच्या एमआयएस खात्यात जमा असलेली संपूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.

लक्षात ठेवा की एमआयएस योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिसचं बचत खातं असणं आवश्यक आहे. जर तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये कोणतंही बचत खातं नसेल, तर तुम्हाला प्रथम बचत खातं उघडावं लागेल, त्यानंतरच तुम्ही मंथली इनकम स्कीममध्ये खातं उघडू शकता.