New IPO : १ नोव्हेंबरला येणार Policybazaar चा IPO; कमाईची मोठी संधी, पाहा प्राईज बँड आणि अन्य डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 03:17 PM2021-10-27T15:17:22+5:302021-10-27T15:24:02+5:30

१ नोव्हेंबरला उघडणार IPO. कंपनी जारी करणार ६,०७,३०,२६५ शेअर्स. पाहा अधिक माहिती.

Latest IPO News : इन्शुरन्स अॅग्रीगेटर Policybazaar ची पॅरेंट कंपनी FB Fintech नं आपल्या कंपनीच्या आयपीओची तारीख जाहीर केली आहे. कंपनीचा आयपीओ १ नोव्हेंबरला उघडेल आणि ३ नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे.

कंपनीच्या IPO चा प्राईस बँड ९४०-९८० रुपये आहे. या अंतर्गत २ रुपये फेस व्हॅल्यूचे ६,०७,३०,२६५ शेअर्स जारी केले जातील.

ज्या अर्जदारांना शेअर्सचे वाटप केले जाणार नाही, त्यांचे पैसे ११ नोव्हेंबर रोजी परत केले जातील, तर ज्यांना शेअर्स अलॉट होतील त्यांच्या खात्तात १२ नोव्हेंबर रोजी शेअर्स जमा केले जातील.

रिपोर्ट्सनुसार, PB Fintech या इश्यूद्वारे ५७०९.७२ कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. या अंतर्गत, ३७५० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील.

तर विद्यमान प्रवर्तक आणि भागधारक ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) १९५९.७२ कोटी रुपयांचे शेअर्स विकतील. कंपनीतील गुंतवणूकदार SVF Python II (Cayman) १८७५ कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहे. पीबी फिनटेकमध्ये कंपनीची यात ९.४५ टक्के भागीदारी आहे.

कोटक महिंद्रा ( Kotak Mahindra Capital), मॉर्गन स्टॅनले (Morgan Stanley) आयसीआयसीआय सिक्युरिटीज (ICICI Securities), एचडीएफसी बँक लिमिटेड ( HDFC Bank Ltd), आयआयएफ सिक्युरिटीज ( IIFL Securities), सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया (Citigroup Global Markets India) आणइ जॅफ्रीज इंडिया या आईपीओच्या बुक रनिंगसाठी लीड मॅनेजर्स असतील.

पॉलिसीबझारसह इतर ब्रँडबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनी आयपीओद्वारे उभारलेल्या निधीपैकी १५०० कोटी रुपये खर्च करेल.

ग्राहक संख्या वाढवण्यासाठी कंपनी ३७५ कोटी रूपये खर्च करणार आहे. यामध्ये ऑफलाइन चॅनेलद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचणे देखील समाविष्ट आहे.

याव्यतिरिक्त, कंपनी ६०० कोटी रुपयांची धोरणात्मक गुंतवणूक आणि अधिग्रहण करणार आहे. याशिवाय ३७५ कोटी रुपयांसह देशाबाहेर विस्तार करेल. कंपनी हा निधी सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी देखील वापरू शकते.

Read in English