शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM Kisan योजनेची लाभार्थी यादी जारी; या स्टेप्स फॉलो करा अन् आपले नाव तपासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 04:59 PM2023-10-29T16:59:56+5:302023-10-29T17:13:58+5:30

PM Kisan : पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव सहज तपासू शकता.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने २०१८ च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये मिळते. यावर्षी जुलैमध्ये या योजनेचा १४ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केला होता.

आता देशातील कोट्यवधी शेतकरी १५ वा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत. जर तुम्हीही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी केली असेल, तर आता तुम्ही पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव सहज तपासू शकता.

सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी (https://pmkisan.gov.in/) च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला वेबसाइटवर दिसत असलेल्या Know Your Status चा पर्याय निवडावा लागेल.

यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन नंबर) टाकावा लागेल. जर तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर Know your registration no या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल.

आता तुम्हाला एक ओटीपी मिळेल. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक कळेल. नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस कळेल.

तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या गावातील लोकांची नावे पाहायची असतील, तर तुम्हाला पीएस किसान वेबसाइटवर जाऊन Beneficiary List चा पर्याय निवडावा लागेल.

यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल. यानंतर, तुम्ही Beneficiary List डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नावासह गावातील आणखी कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे ते पाहू शकता.

पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही पीएम किसान योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी १५५२६१ वर कॉल करू शकता.