शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Provident Fund Interest: ६ कोटी PF खातेधारकांना दिवाळीपर्यंत मिळू शकतं व्याज; असा चेक करा बॅलन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 3:38 PM

1 / 7
Provident Fund Interest before Diwali : कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) ६ कोटीहून अधिक खातेदारांना दिवाळीच्या जवळपास एक मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. मीडिया रिपोर्टनुसार, ईपीएफओ लवकरच २०२०-२१ साठी ६ कोटीहून अधिक ग्राहकांच्या खात्यात व्याज हस्तांतरित करण्याची घोषणा करू शकते.
2 / 7
सरकारनं यापूर्वी २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ग्राहकांच्या खात्यावर पीएफवर ८.५ टक्के व्याज हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. जर तुम्ही देखील EPFO ​​खातेधारक असाल तर तुमच्या खात्यात व्याजाचे पैसे लवकरच येऊ शकतात.
3 / 7
जर तुम्हाला पीएफ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे हे कसं पाहायचं हे माहित नसेल तर, तुम्ही पुढील प्रक्रियेद्वारे ते पाहू शकता. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. चार वेगवेगळ्या प्रकारांद्वारे तुम्ही ही माहिती मिळवू शकता.
4 / 7
एका मिस्ड कॉलद्वारेही तुम्ही माहिती मिळवू शकता. तुमच्या पीएफ खात्याशी जो क्रमांक लिंक आहे त्या नंबरवरून 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्वावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर नंबरवर एक मेसेज येईल. त्यामध्ये तुमचा पीएफ बॅलन्स तुम्हाला समजेल.
5 / 7
एसएमएसद्वारेही तुम्ही पीएफ खात्यातील बॅलन्स तपासून पाहू शकतो. यासाठी तुमचा UAN क्रमांक EPGO खात्याशी जोडलेला असणं आवश्यत आहे. तुम्हाला रजिस्टर्ड क्रमांकावरून EPFOHO UAN लिहून 7738299899 यावर एसएमएस पाठवावा लागेल. जर तुम्हाला अन्य भाषांमध्ये बॅलन्स तपासायचा असेल तर त्या भाषेचा कोड उदा. हिंदीसाठी EPFOHO UAN HIN असा मेसेज पाठवावा लागेल.
6 / 7
याशिवाय तुम्ही UMANG या अॅपद्वारेही बॅलन्स चेक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये UMANG APP डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर यात लॉग इन करा. त्यात देण्यात आलेल्या मेन्यूमध्ये जाऊन ‘Service Directory’ मध्ये जा. त्या ठिकाणी EPFO हा ऑप्शन सर्च करा. त्यानंतर View Passbook मध्ये गेल्यावर UAN नंबर आणि OTP द्वारे बॅलन्स पाहा.
7 / 7
यासाठी आणखी एक पर्याय म्हणजे तुम्ही EPFO च्या वेबसाईटवर जाऊन ई पासबुकवर क्लिक करा. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड तसंच कॅप्चा भरावा लागेल. त्यानंतर तुम्ही एका नव्या पेजवर जाल. त्या ठिकाणी मेंबर आयडी निवडावा लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला ईपासबूकवर ईपीएफ बॅलन्स पाहता येईल.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीInvestmentगुंतवणूक