शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच चाललेत, इंधन वाचवायचे तर ‘हे’ १० उपाय करून तर पाहा; हमखास बचत होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 09:53 IST

1 / 15
Fuel Shortage Crisis: पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेलपुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचे गंभीर परिणाम भारतावर होण्याची चिन्हे आहेत. या संकटाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) ‘वर्क फ्रॉम होम’ (घरातून काम) वाढवण्याचा आणि विमान प्रवास कमी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 / 15
Petrol Diesel Price Hike: इंधनाचा वापर कमी करून वाढत्या किमतींचा दबाव रोखण्यासाठी १० कलमी कार्यक्रमही ‘आयईए’ने सुचविला आहे. ‘आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थे’ने इंधन टंचाईवर सुचविलेले उपाय जाणून घेऊया...
3 / 15
आठवड्यातून ३ दिवस वर्क फ्रॉम होम : शक्य असलेल्या ठिकाणी आठवड्यातून अतिरिक्त ३ दिवस घरातून काम केल्यास कारमधील इंधन वापरात ६ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.
4 / 15
वेगमर्यादा कमी करा : हायवेवर वाहनांचा वेग ताशी १० किलोमीटरने कमी केल्यास इंधनाची मोठी बचत होईल. वेग कमी केल्याने प्रवासी गाड्या, व्हॅन आणि ट्रक यांचा इंधन वापर कमी होतो.
5 / 15
सार्वजनिक वाहतुकीचा वापर : खासगी गाड्यांऐवजी बस, ट्रेन किंवा सामायिक वाहनांना प्राधान्य द्यावे.
6 / 15
विमान प्रवास टाळा : अत्यावश्यक नसेल तर व्यावसायिक विमान प्रवास टाळण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे एटीएफची (विमान इंधन) मागणी १५ टक्क्यांपर्यंत कमी होईल.
7 / 15
नंबर-प्लेट रोटेशन : मोठ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या दिवशी खासगी वाहनांना रस्त्यावर येण्याचे बंधन घाला. नंबर-प्लेट रोटेशनसारख्या योजनांमुळे वाहतूक कोंडी आणि इंधनाचा वापर कमी होतो.
8 / 15
कार शेअरिंग वाढवा : एकाच गाडीत अधिक प्रवासी आणि इको-ड्रायव्हिंगमुळे इंधन बचत जलद होते.
9 / 15
चांगल्या ड्रायव्हिंग पद्धती : व्यावसायिक वाहने आणि मालवाहतुकीसाठी कार्यक्षम ड्रायव्हिंग आवश्यक आहे. चांगल्या ड्रायव्हिंग पद्धती, वाहनांची देखभाल आणि योग्य लोड व्यवस्थापनामुळे डिझेलचा वापर कमी होतो.
10 / 15
एलपीजीचा वाहतुकीतील वापर कमी करा : दुहेरी इंधन (बाय-फ्युएल) वाहनांना पेट्रोलकडे वळवून एलपीजी स्वयंपाक आणि आवश्यक वापरासाठी राखता येते.
11 / 15
आधुनिक स्वयंपाक पद्धतींकडे वळा : शक्य असल्यास इतर आधुनिक स्वयंपाक पद्धतींकडे वळा. इलेक्ट्रिक कुकिंगसारख्या पर्यायांमुळे एलपीजीवरील अवलंबित्व कमी होते.
12 / 15
उद्योगातील तेलाचा वापर कमी करा : पेट्रोकेमिकल फीडस्टॉक्समध्ये लवचिकता आणि अल्पकालीन कार्यक्षमता उपाय करा. उद्योग क्षेत्र तातडीच्या ऑपरेशनल सुधारणा करून तेलाचा वापर कमी करताना आवश्यक वापरासाठी एलपीजी उपलब्ध करून देऊ शकते.
13 / 15
हे सारे कशामुळे : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जगातील सर्वांत महत्त्वाचा तेल मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी जवळपास बंद झाली आहे. त्यामुळे जगावर इंधनसंकट आले आहे.
14 / 15
४५ टक्के इंधन रस्ते वाहतुकीवर खर्च होते. त्यामुळे ही वाहतूक कमीतकमी केल्यास जगावरचा इंधनाचा भार कमी होईल, असे आयईए अहवालात म्हटले आहे.
15 / 15
भारतात संकट का? ५० टक्के तेल आयात आणि ९० टक्के एलपीजी आयात होर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गावरून होते. १०० डॉलर दर प्रति बॅरलच्या पुढे कच्च्या तेलाचे गेल्याने सध्या देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे.
टॅग्स :Fuel Crisisइंधन टंचाईFuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपDieselडिझेलCrude Oilखनिज तेलLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईCylinderगॅस सिलेंडरUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIndiaभारतIndiaभारत