ट्रेनमध्ये पाय ठेवताच प्रवाशांना मिळतात हे 'खास' अधिकार, रोज प्रवास करणाऱ्यांनाही माहीत नसतील! जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 07:57 PM2023-04-03T19:57:57+5:302023-04-03T20:10:43+5:30

आपल्याला माहीत आहे का की, ट्रेनमध्ये चढताच प्रवाशांना काही खास अधिकार मिळतात, ज्यांचा वापर ते वेळ प्रसंगी करू शकतात...

भारतातीय रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. तब्बल 13,000 हून अधिक रेल्वे गाड्या रोज रुळांवरून धावतात आणि सुमारे 2.4 कोटी लोक रोज ट्रेनमधून प्रवास करतात. पण आपल्याला माहीत आहे का की, ट्रेनमध्ये चढताच प्रवाशांना काही असे अधिकार मिळतात, ज्यांचा वापर ते वेळ प्रसंगी करू शकतात.

माध्यमांतील वृत्तांनुसार, एखादा प्रवासी कुठल्याही कॅटेगिरीच्या डब्यातून प्रवास करत असेल आणि त्याच्या जवळ आरक्षित तिकीट असेल तर त्याला 5 महत्त्वाचे अधिकार मिळतात. खरे तर अधिकांश प्रवाशांना यासंदर्भात माहितीच नसते. हे अधिकार सुरक्षिततेपासून आरोग्याशी संबंधित असतात. जर जाणून घेऊयात यासंदर्भात

मेडिकल हेल्प - जर आपण ट्रेनने लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर आणि आपली प्रकृती बिघडली, तर मेडिकल सुविधा पुरविणे रेल्वेचे काम असते. टीटीई आणि सुप्रीटेंडंट प्रवाशांना शक्त ती सर्व प्रकारची मदत पोहोचवतील. तसेच पुढील स्थानकावर प्रवाशाला मोफात उपचाराची सुविधाही देण्यात येईल.

तत्काळ तिकिटावर रिफंड - जर आपल्याला असे वाटत असेल की, तत्काळ तिकिटावर रिफंड मिळत नाही, तर आपण चूक आहात. रेल्वे यावरही रिफंड देते. मात्र यासाठी काही अटी आहेत. अर्थात, ट्रेनचा मार्ग बदलला असेल अथवा ट्रेन 3 तासांहून अधिक उशिरा असेल तर, रिफंड तिकीटाचे पैसे रिफंड होऊ शकतात.

...तर कुण्या दुसऱ्याला मिळेल तिकीट - जर आपण एखाद्या ट्रेनमध्ये बुकिंग केली असेल तर, आपल्याला ज्या स्थानकावरून चढायचे आहे, त्याच्या पुढील दोन स्थानकांपर्यंत सीटवर आपलाच अधिकार असतो. जर आपण एखाद्या दुसऱ्या डबात चढलात तर, पुढील दोन स्थानके येण्यापूर्वी आपल्या सीटवर पोहोचा. अन्यथा टीटीई कुण्या दुसऱ्या प्रवाशाला आपले सीट देऊ शकतो.

रात्रीसाठी आहे हा खास नियम - रेल्वेच्या नियमानुसार, टीटी आपल्याला रात्री 10 वाजेनंतर उठवून तिकीट चेक करू शकत नाही. मात्र कुणी त्याच काळात ट्रेनमध्ये चढले असेल तर, त्याचे तिकीट चेक केले जाऊ शकते.

...तर मिळेलील संपूर्ण पैसे - जर आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचे असेल, पण ट्रेन मधेच बंद पडली आणि पुढे जाण्यासाठी रेल्वेने कुठल्याही प्रकारची व्यवस्था केली नसेल तर आपण संपूर्ण पैसे रिफंड मागू शकता. तसेच, रेल्वेने पुढे जाण्याची व्यवस्था केली असेल, पण प्रवाशाची या व्यवस्थेने पुढे जाण्याची इच्छा नसेल, तर तो पुढील भाडे क्लेम करू शकतो. अशा वेळी प्रवाशाला तिकीट सरेंडर करावे लागेल.

भारतातीय रेल्वे...