बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:21 IST2025-07-28T16:45:28+5:302025-07-28T17:21:49+5:30
आपल्या देशात १० रुपयांना लिटर मिळणारे पाणी काही देशांमध्ये त्याची किंमत हजाराच्या घरात आहे.

पाणी आपल्यासाठी महत्वाचे आहे. पाण्याविना आपण जगूच शकत नाही. आपल्याकडे पाणी सहज उपलब्ध होते. पाण्याच्या किंमतीही आपल्याकडे कमी आहेत.
भारतात साधारणपणे १ लिटर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीची किंमत २० रुपये आहे. पण काही देशांमध्ये याच पाण्याची किंमत एक हजार रुपयांच्या पुढे आहे.
स्वित्झरर्लंडमध्ये पिण्याच्या पाण्याची किंमत मोठ्या प्रमाणात आहे. स्वित्झर्लंड सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.
हा देश एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. विविध देशांमधून लाखो लोक येथे भेट देण्यासाठी येतात. स्वित्झर्लंड हा जगातील सर्वात महागड्या देशांपैकी एक देश आहे.
या देशात १ लिटरच्या पाण्याच्या बाटलीची किंमत हजारो रुपयांमध्ये आहे. स्वित्झर्लंडमध्ये १ लिटरच्या पाण्याच्या बाटलीची किंमत अंदाजे ११२६ रुपये आहे. तर भारतात हेच पाणी २० रुपयांना मिळते.
स्वित्झर्लंडमध्ये पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेसाठी एवढे पैसे आकारते. शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमुळे इथल्या पाण्याची किंमती महाग आहेत.
स्वित्झर्लंडमध्ये पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया खूपच महाग आहे. याशिवाय, स्वित्झर्लंडमध्ये नैसर्गिक स्रोतांमधून पाणी सहज उपलब्ध होत नाही.
तसेच, सर्व गोष्टींच्या किमती जास्त असल्याने, येथे पाणी देखील महाग आहे.