मद्य तयार करणारी कंपनी देणार कमाईची संधी, IPO द्वारे २ हजार कोटी जमवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 20:19 IST2022-06-28T20:07:18+5:302022-06-28T20:19:46+5:30
Allied Blenders & Distillers IPO: आयपीओ म्हणजेच इनिशिअल पब्लिक ऑफरिंग मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आली आहे.

Allied Blenders & Distillers IPO: आयपीओ म्हणजेच इनिशिअल पब्लिक ऑफरिंग मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आली आहे. ऑफिसर्स चॉईस व्हिस्की तयार करणारी कंपनी एलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स (Allied Blenders & Distillers) या कंपनीचा आयपीओ येणार आहे.
कंपनीने आपला मसुदा रेड-हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे मंगळवारी दाखल केला आहे. कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 2,000 कोटी रुपये उभारणार आहे.
कंपनीच्या ड्राफ्ट प्रोस्पेक्टसनुसार ऑफिसर्स चॉईस व्हिस्कीच्या उत्पादकांनी 2 हजार कोटी रूपयांच्या सुरुवातीच्या शेअर विक्रीतून 1 हजार कोटी रूपयांचे फ्रेश इश्यू ठेवले आहेत. अन्य प्रमोटर्स आणि शेअरधारकांद्वारे 1 हजार रूपयांच्या शेअर्स विक्रीसाठी एक प्रस्ताव सामील असेल.
प्रमोटर्सशिवाय किशोर छाब्रिया ओएफएसद्वारे 500 कोटी रूपयांचे शेअर विकणार आहेत. तर प्रमोटर रेशम छाब्रिया, जितेंद्र हेमदेव आणि निशा किशोर छाब्रिया 250 कोटी रूपयांचे शेअर विकणार आहेत.
किशोर राजाराम छाब्रिया, बिना किशोर छाब्रिया, रेशम छाब्रिया, जितेंद्र हेमदेव, बिना छाब्रिया एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड, बीकेसी एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड, ओरिएंटल रेडिओज प्रायव्हेट लिमिटेड आणि ऑफिसर्स चॉइस स्पिरिट्स प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत. कंपनी आयपीओद्वारे उभारलेल्या पैशाचा वापर कर्ज फेडण्यासाठी करेल.