National Pension Scheme: नोकरी असेल किंवा नसेल, तुम्हालाही मिळणार पेन्शन; जाणून घ्या या स्कीमबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 01:01 PM2021-12-02T13:01:23+5:302021-12-02T13:08:39+5:30

NPS Scheme In Marathi: सध्या आपण सगळे कमावते असतो, हातपाय चालत असतात तोवर ठीक. परंतू, निवृत्तीनंतर काय? घर खर्च, औषधांचा खर्च कसा चालणार? तुम्हाला 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू शकते, यासाठी तुम्ही नोकरदार नसला तरी चालते.

कोरोना काळाने आपल्याला एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत हवेत हे समजले. सध्या आपण सगळे कमावते असतो, हातपाय चालत असतात तोवर ठीक. परंतू, निवृत्तीनंतर काय? घर खर्च, औषधांचा खर्च कसा चालणार? आजच्या उत्पन्नातून काही रक्कम बाजुला काढली आणि ती योग्य ठिकाणी गुंतविली तर हा प्रश्न सुटू शकतो. तुम्हाला 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू शकते, यासाठी तुम्ही नोकरदार नसला तरी चालते.

केंद्र सरकारची राष्ट्रीय पेन्शन योजना आहे. याला एनपीएस देखील म्हणतात. या योजनेमुळे नागरिकांना सेवानिवृत्तीसाठी बचतीची सवय लागते. जर तुम्ही या पेन्शन स्कीममध्ये पैसे गुंतविले तर तुम्हाला भविष्यात आर्थिक दृष्ट्या कोणत्याही संकटांचा सामना करावा लागणार नाही. महत्वाचे म्हणजे या योजनेत कोणीही गुंतवणूक करू शकतो.

या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर मिळणारा परतावा हा ठरलेला आहे. यावर 9 ते 12 टक्के व्याज दिले जाते. एनपीएस अंतर्गत चार सेक्टर येतात. याद्वारे तुम्ही खाते उघडू शकता.

केंद्र सरकार - ही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. राज्य सरकार - ही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. कार्पोरेट सेक्टर - ही खासगी क्षेत्राशी निगडीत कर्मचाऱ्यांसाठी आहे. ऑल सिटीजन मॉडल - यामध्ये तुम्ही स्वत: एनपीएस अकाऊंट उघडू शकता.

या योजनेतून दोन प्रकारची अकाऊंट उघडता येतात. यामध्ये एनपीएस टियर १ आणि एनपीएस टियर २. टियर १ अकाऊंटला सेवानिवृत्तच्या बचतीसाठी बनविण्यात आले आहे. हे एक रिटायरमेंट पेन्शन अकाऊंट आहे.

तर टियर २ खाते हे म्युच्युअल फंडासारखे काम करते. यामध्ये तुम्ही जेव्हा हवे तेव्हा पैसे काढू शकता. या स्कीममधून तुम्ही रकमेच्या 60 टक्के पैसे काढू शकता. उरलेल्या पैशांचा तुम्हाला अॅन्युईटी प्लॅन खरेदी करावा लागतो.

NPS स्कीममध्ये टोटल वेल्थ आणि तुम्हाला मिळणारी पेन्शन अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. याकाळात इक्विटी मार्केटने कशी कामगिरी केली? तुमचे वय किती आदी गोष्टी विचारात घेतल्या जातात. या स्कीममध्ये 18 ते 65 वर्षांच्या वयाचा कोणाही व्यक्ती गुंतवणूक करू शकतो.

महत्वाचे म्हणजे एनपीएसमध्ये तुम्ही ऑनलाईन इन्व्हेस्ट करू शकता. जर तुमचे एनपीएस अकाऊंट कोणत्याही बँकेत असेल तर तुम्ही बँकेच्या वेबसाईटवरून ऑनलाईन पैसे वळते करू शकता.