By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 14:23 IST
1 / 5National Pension System (NPS): नॅशनल पेन्शन स्कीमचा वापर बहुतेक लोक 50,000 रुपयांचा अतिरिक्त कर लाभ घेण्यासाठी करतात. खूप कमी लोकांना माहिती आहे की जर योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतर दरमहा 50,000 रुपये पेन्शन मिळू शकते.2 / 5NPS ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. परंतु, ते निवृत्तीनंतर तुम्हाला पेन्शनचे उत्पन्न देते. जुन्या पेन्शन योजनेच्या विपरीत, NPS मध्ये पेन्शनच्या रकमेची कोणतीही हमी नाही. पेन्शनची रक्कम तुमच्या जमा झालेल्या कॉर्पसवर अवलंबून असते. असे असूनही, हे उत्पादन निवृत्तीनंतर तुम्हाला उत्पन्नाची हमी देते.3 / 5NPS मधून दरमहा 50,000 रुपये पेन्शन कसे मिळू शकते हे जाणून घेण्यापूर्वी, तुम्हाला NPS मधील अॅन्युइटीशी संबंधित नियम समजून घ्यावे लागतील. तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की संपूर्ण NPS कॉर्पस मॅच्युरिटीनंतर तुमच्या हातात येणार नाही. अॅन्युइटी खरेदी करण्यासाठी तुम्हाला किमान 40 टक्के निधी वापरावा लागेल. या अॅन्युइटीमधून तुम्हाला निवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन मिळेल.4 / 5तुम्ही उर्वरित 60 टक्के रक्कम काढू शकता, जी करमुक्त असेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही अॅन्युइटी खरेदी करण्यासाठी 40 टक्क्यांहून अधिक निधी वापरू शकता. तुम्ही अॅन्युइटी खरेदी करण्यासाठी 100 टक्के कॉर्पस देखील वापरू शकता. जर तुम्हाला NPS मधून मासिक 50,000 रुपये पेन्शन हवे असेल, तर 40 टक्के अॅन्युइटीचा नियम लक्षात घेऊन त्याचं कॅलक्युलेशन करावं लागेल. सर्वात सोपा आणि नवीन अॅन्युइटी दर 6 टक्के मानला जाऊ शकतो.5 / 5तुम्ही अॅन्युइटी खरेदी करण्यासाठी 40 टक्के NPS वापरत असल्यास, 6 टक्के अॅन्युइटी दराने तुम्हाला 2.5 कोटी रुपयांचा NPS कॉर्पस आवश्यक आहे. यातील 40 टक्के म्हणजे 1 कोटी रुपये अॅन्युइटी खरेदी करण्यासाठी वापरले जातील. या अॅन्युइटीमधून तुम्हाला दरमहा 50,000 रुपये वार्षिक 6 टक्के दराने पेन्शन मिळेल. बाकी दीड कोटी रुपये तुमच्या हातात येतील. (टीप- कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)