नोकरीत भागत नाही? बिझनेसचा विचार करताय? पैसे कसे उभे करणार? हे आहेत मार्ग....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 09:02 IST2022-12-18T08:43:57+5:302022-12-18T09:02:09+5:30
स्टार्टअप्ससाठी जगभरातून तुम्ही कोट्यवधी रुपये जमा करू शकता, कसे ते जाणून घेऊ...

सध्या जगभरात जागतिक मंदीचे वातावरण असून, आतापर्यंत लाखो जणांना कामावरून कमी केले आहे. त्यामुळे नोकरीपेक्षा स्वत:चा व्यवसाय असावा, असा कल वाढला आहे. मात्र, स्टार्टअप्ससाठी मोठ्या प्रमाणात निधीही जमवावा लागतो. स्टार्टअप्ससाठी जगभरातून तुम्ही कोट्यवधी रुपये जमा करू शकता, कसे ते जाणून घेऊ...
क्राउड फंडिंग
क्राउड फंडिंग करण्यासाठी तुम्हाला एक व्यासपीठ लागेल किंवा त्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचीही मदत घेऊ शकता. तुम्हाला तुमचे नियोजन लोकांसमोर शेअर करावे लागेल. ज्यांना तुमची कल्पना आवडते, ते पैसे देतात.
बँकेकडून कर्ज
गेल्या काही वर्षांपासून बँकांनीही स्टार्टअप्सना कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, बँकेकडून कर्ज मिळविण्यासाठी अनेक कागदोपत्रे कामे करावी लागतात. यासाठी तुमच्या आर्थिक गरजांचे आकलन केल्यानंतर बँकेत कर्जासाठी अर्ज करा.
सरकारी योजना
सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजना आणि स्टँडअप इंडिया या दोन योजना लोकप्रिय आहेत. मुद्रा योजनेंतर्गत ५०,००० ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. काही योजनांना एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळते.
व्हेंचर कॅपिटल
व्हेंचर कॅपिटल म्हणजे आपला हिस्सा घेऊन दुसऱ्याच्या व्यवसायात पैसे गुंतवणे, हेदेखील एक अतिशय लोकप्रिय फंडिंग माध्यम आहे. यामध्ये स्टार्टअप सुरू करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या नफ्यातील काही हिस्सा वाटून घ्यावा लागतो.
ते गुंतवणूकदार ओळखा
स्टार्टअप्ससाठी निधीचा हा मुख्य स्रोत आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना कुठेतरी गुंतवणूक करायची आहे. त्यांना ओळखा आणि प्रोजेक्टबद्दल सांगा. प्रकल्पावर समाधानी असल्यास, ते निधी देतात. त्या बदल्यात ते स्टार्टअपमध्ये वाटा घेतात.
इनक्युबेटर
या पद्धतीमध्ये, इनक्युबेटर ते कल्पना निर्मितीपासून उत्पादन तयार होईपर्यंत मदत केली जाते, तर एक्सलरेटर व्यवसायाचा वेग वाढवण्यास मदत करतात. एकदा का एखादा व्यावसायिक यामध्ये सहभागी झाला की त्याला स्टार्टअपलाही वेळ द्यावा लागतो.