New Labour Code: मोदी सरकार 1 ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत, PF मध्येही होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 05:41 PM2021-07-31T17:41:27+5:302021-07-31T17:49:39+5:30

New labour code 2021: मोदी सरकारच्या या नव्या कामगार कायद्यामुळे आपल्या पीएफमध्ये जाणारे योगदानही मोठ्या प्रमाणावर वाढेल.

मोदी सरकार 1 ऑक्टोबरपासून नवा कामगार कायदा (New Labour Code) लागू करण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकारची (Narendra Modi Government) ही योजना यशस्वी ठरली तर तुम्हालाही तुमच्या कार्यालयात आठवड्यातून केवळ 4 दिवसच काम करावे लागेल. (New labour code 2021 PM Narendra Modi gift four day workweek three days weekend in india)

मोदी सरकारच्या या नव्या कामगार कायद्यामुळे आपल्या पीएफमध्ये जाणारे योगदानही मोठ्या प्रमाणावर वाढेल.

यापूर्वी मोदी सरकार हा नियम एप्रिल 2021 पासूनच लागू करणारे होते. मात्र, राज्य सरकारांची सहमती न मिळाल्याने, आता हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू केला जाऊ शकतो.

नव्या लेबर कोडचा परिणाम - मोदी सरकारच्या या नव्या कामगार कायद्यात वेतन, इंडस्ट्रिअल रिलेशन, सोशल सिक्योरिटी आणि ऑक्यूपेशनल सेफ्टी अँड हेल्थचाही समावेश आहे. आता हे नियम देशभरात लागू करण्याची केंद्र सरकारची इच्छा आहे आणि याची तयारीही सुरू आहे.

हा कायदा लागू झाल्यानंतर पगारदार कर्मचाऱ्यांना अनेक बदलांना सामोरे जावे लागू शकते. याच बरोबर, कर्मचाऱ्यांची बेसिक किमान सॅलरी (Basic Minimum Salary) वाढविली जावी, यावरही सध्या चर्चा सुरू आहे.

मोदी सरकारच्या नव्या कामगार कायद्यामुळे सध्याच्या 44 केंद्रीय कामगार कायद्यांना तर्कसंगत बनविण्यासाठी मदत मिळेल.

काही राज्यांनी तर नव्या कामगार कायद्याशी संबंधित ड्राफ्ट रूल सर्क्युलेट करायलाही सुरुवात केली आहे. यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, हरियाणा, ओडिशा, पंजाब, गुजरात, कर्नाटक आणि उत्तराखंड आदी राज्यांचा समावेश आहे.

नव्या कामगार कायद्याचा PF वर परिणाम - केंद्र सरकारचा नवा कामगार कायदा लागू झाल्यानंतर ग्रॅच्युइटी आणि पीएफ (Gratuity & PF)मधील योगदानाची रक्कमही वाढेल. यानंतर आपल्या हातात येणारे मासीक वेतनही कमी होऊ शकते.

असंघटित क्षेत्रांनाही लागू - नवा वेतन कायदा (wage code) असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही लागू असेल. सॅलरी आणि बोनस संदर्भातील नियमही या नव्या कायद्यानंतर बदलतील आणि प्रत्येक इंडस्ट्री तथा सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सॅलरी एकसारखीच होईल.

तीन दिवसांचा विकेंड - भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयानुसार, हा कायदा लागू झाल्यानंतर, 8 ऐवजी 12 तासांचे शिफ्ट होऊ शकते. या शिफ्टमध्ये दर पाच तासांनंतर अर्ध्या तासाचा ब्रेक मिळू शकतो. यानुसार आपल्याला दर आठवड्याला 48 तास काम करावे लागेल. तसेच जर कुणी 8 तास काम करत असेल तर त्याला आठवड्यातून 6 दिवस काम करावे लागेल. तसेच आपण रोज बारा तास काम केल्यास आपल्याला आठवड्यातून तीन दिवस सुट्टी मिळू शकते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!