National Pension System: दरमहा मिळेल 45,000 रुपये पेन्शन, लखपती बनवणार NPS स्कीम, जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 03:36 PM2021-12-31T15:36:46+5:302021-12-31T15:42:13+5:30

National Pension System: नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) ही पेन्शन तसेच गुंतवणूक योजना आहे. वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी भारत सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला वृद्धापकाळात एक निश्चित पेन्शन मिळू शकते.

नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) ही पेन्शन तसेच गुंतवणूक योजना आहे. वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी भारत सरकारने ही योजना सुरू केली आहे. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे दिली केली जाते.

तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मध्ये गुंतवणुकीचा पॅटर्न चार वेळा बदलू शकता. पेन्शन फंड रेग्युलेटर पीएफआरडीएचे अध्यक्ष सुप्रतीम बंदोपाध्याय म्हणाले की, लवकरच नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) योजनेच्या सदस्यांना आर्थिक वर्षात चार वेळा गुंतवणूक पॅटर्न बदलण्याची परवानगी दिली जाईल. सध्या NPS सदस्यांना वर्षातून फक्त दोनदा गुंतवणूक पॅटर्न बदलण्याची परवानगी आहे.

NPS च्या माध्यमातून तुम्ही नोकरी करत असतानाही दर महिन्याला चांगली पेन्शन मिळवू शकता. नॅशनल पेन्शन सिस्टीम हा पेन्शन योजनेचा एक प्रकार आहे. या योजनेंतर्गत, वयाच्या 60 नंतर तुम्हाला दरमहा नियमित उत्पन्न मिळत राहील.

NPS अंतर्गत, तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी दरमहा 5000 रुपये गुंतवल्यास केल्यास, तुमची गुंतवणूक आणि त्यावर मिळणारे व्याज यावर अवलंबून वयाच्या 60 नंतर हा फंड सुमारे 1.2 कोटी रुपये असेल. यापैकी, तुम्हाला मॅच्युरिटीवर 45 लाख रुपयांची एकरकमी रक्कम मिळेल. यासोबतच दरमहा 45 हजार रुपयांपर्यंतची पेन्शनही मिळेल.

या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर परताव्याची टक्केवारी निश्चित होत नाही, परंतु आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला तर गुंतवणूकदारांना 10-11 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

18 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. एखादी व्यक्ती फक्त एकच NPS खाते उघडू शकते. यात जॉइंट अकाउंट उघडता येत नाही.

या योजनेअंतर्गत तुम्ही दोन प्रकारची खाती उघडू शकता. यामध्ये पहिला टियर-1 पर्याय आहे. या पर्यायामध्ये तुम्हाला जे काही पैसे जमा केले जातील ते वेळेपूर्वी काढता येणार नाहीत. जेव्हा तुम्ही योजनेतून बाहेर जाल तेव्हाच तुम्ही पैसे काढू शकता.

टियर-2 खाते उघडण्यासाठी, तुम्ही टियर 1 खातेधारक असणे आवश्यक आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पैसे जमा किंवा काढू शकता. प्रत्येकाने हे खाते उघडणे बंधनकारक नाही.

सध्या, NPS सदस्यांना त्यांची गुंतवणूक विविध उत्पादनांमध्ये गुंतवण्याचा पर्याय निवडण्याची परवानगी आहे. यात सरकारी सिक्युरिटीज, बाँड्स, शॉर्ट टर्म बाँड गुंतवणूक, शेअर्स आणि संबंधित गुंतवणूक आहेत.

बंदोपाध्याय यांनी असेही सांगितले की, पीएफआरडीए ग्राहकांना महागाईपासून संरक्षण देण्याच्या उद्देशाने सेवानिवृत्तीनंतर निश्चित उत्पन्न देण्यासाठी परिवर्तनीय आर्थिक उत्पादन (NUT) सादर करू इच्छित आहे.