₹20 च्याही खाली आलाय मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी तुटून पडले लोक; जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 20:48 IST2025-01-07T20:38:18+5:302025-01-07T20:48:01+5:30
ट्रेडिंग दरम्यान स्टॉकमध्ये रिकव्हरीही झाली आणि तो 1.25% ने वाधारून 20.20 रुपयांपर्यंत पोहोचला...

शेअर बाजारात गत सोमवारच्या मोठ्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजार मंगळवारी पुन्हा एकदा रिकव्हरी मोडमध्ये दिसला. दरम्यान कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड चढउतार बघायला मिळाला. असाच एक शेअर आहे आलोक इंडस्ट्रीज या टेक्सटाईल कंपनीचा.
या कंपनीच्या शेअरने मंगळवारी 52 आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली. व्यापारादरम्यान हा शेअर 19.85 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला. तथापि, ट्रेडिंग दरम्यान स्टॉकमध्ये रिकव्हरीही झाली आणि तो 1.25% ने वाधारून 20.20 रुपयांपर्यंत पोहोचला.
शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 39.24 रुपये आहे. हा भाव गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात होता. आलोक इंडस्ट्रीज ही रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जेएम फायनान्शिअल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन यांचा संयुक्त उपक्रम आहे.
आलोक इंडस्ट्रीजमध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्सची 40.01 टक्के तर जेएम फायनान्शियल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीची 34.99 टक्के हिस्सेदारी आहे. सार्वजनिक भागधारकांबद्दल बोलायचे तर, त्यांचा वाटा 25 टक्के एवढा आहे.
सप्टेंबर तिमाहीचे निकाल - चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आलोक इंडस्ट्रीजचा घाटा वाढला होता. या तिमाहीत कंपनीचा घाटा वाढून 262.10 कोटी रुपये झाला होता. एका वर्षापूर्वी जुलै-सप्टेंबर कालावधीत कंपनीला 174.83 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
या कालावधीत कंपनीचे परिचालन उत्पन्न 35.46 टक्क्यांनी कमी होऊन 885.66 कोटी रुपये राहिले. गेल्या वर्षात याच कालावधीत हे 1,372.34 कोटी रुपये होते. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 25.45 टक्क्यांनी घसरून 1,160.63 रुपये राहिला.
आलोक इंडस्ट्रीजचे इतर उत्पन्नासह एकूण उत्पन्न सप्टेंबरच्या तिमाहीत 34.97 टक्क्यांनी घसरून 898.78 कोटी रुपये एवढे राहिले आहे.
1986 मध्ये एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या रुपाने आलोक इंडस्ट्रीजची स्थापना झाली. यानंतर 1993 पर्यंत या कंपनीचे रुपांतर एक पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये झाले.
ही कंपनी 5 मुख्य विभागांद्वारे कार्य करते. हे विभाग म्हणजे, होम टेक्सटाइल्स, कॉटन यार्न, ॲपेरल फॅब्रिक, गारमेंट्स, टेक्निकल टेक्सटाइल्स आणि पॉलिस्टर. कंपनीने एर्बा आणि लॉर्ड नेल्सन सारखे मिलेटाचे काही ब्रँड भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)